Shraddha Kapoor scared by children with colored balloons video goes viral | घाबरली रे घाबरली, श्रद्धा कपूर रंगांना घाबरली...! पाहा क्यूट व्हिडीओ

घाबरली रे घाबरली, श्रद्धा कपूर रंगांना घाबरली...! पाहा क्यूट व्हिडीओ

ठळक मुद्देफोटोग्राफर रोहन श्रेष्ठाला श्रद्धा डेट करत असल्याचे मानले जात आहे. नुकतीच श्रद्धा रोहन श्रेष्ठासोबत डिनर डेट एन्जॉय करताना दिसली होती.

रंगांचा सण असताना, रंगात न्हाऊन निघण्याची इच्छा कोणाला होणार नाही? पण हे काय? अभिनेत्री श्रद्धा कपूर तर रंगांनाच घाबरली. होय, वॉटर बलून आणि रंग बघून श्रद्धाने चांगलीच धूम ठोकली. तिचा हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 
श्रद्धा बोटीतून उतरते आणि तिला पाहून जवळ एका बोटीवर उभे असलेली बच्चेकंपनी एकच गलका करते. श्रद्धाच्या अंगावर पाण्याने भरलेले फुगे फेकून मारण्यासाठी गोंधळ करू लागते. मग काय श्रद्धा कपूर, तिचे बॉडीगार्ड सगळेच अलर्ट होतात. श्रद्धा तर नाही... नाही... म्हणत, तिथून अक्षरश: धूम ठोकते.  मुलांपासून थोडे लांब गेल्यावर ती या सर्वांना हात हलवून अभिवादन करते. शिवाय होळी व रंगोत्सवाच्या शुभेच्छाही देते.  

श्रद्धा काही दिवसांपूर्वीच मालदीववरून सुट्टी संपवून परतली आहे. मालदीव व्हॅकेशनचे अनेक फोटो श्रद्धाने शेअर केले होते. तिचे हे फोटोही तुफान व्हायरल झाले होते. गेल्या काही दिवसांपासून बी टाऊनमध्ये  श्रद्धा कपूर तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे.

फोटोग्राफर रोहन श्रेष्ठाला श्रद्धा डेट करत असल्याचे मानले जात आहे. नुकतीच श्रद्धा रोहन श्रेष्ठासोबत डिनर डेट एन्जॉय करताना दिसली होती.रोहन श्रेष्ठा हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा असून त्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सध्या रोहन श्रेष्ठा हेही फोटोग्राफी क्षेत्रातले एक मोठे नाव आहे. रोहन आणि श्रद्धा एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत असून त्यांनी 2018 पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली असे म्हटले जात आहे.
   श्रद्धा सध्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून यापूर्वी ती ‘बागी 3’ मध्ये दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shraddha Kapoor scared by children with colored balloons video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.