ठळक मुद्देया व्हिडिओमध्ये श्रद्धाची मावशी, सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेने सांगितले की, “श्रद्धा तिच्या आजोबांची, स्व. पंढरीनाथ कोल्हापुरे यांची खूप लाडकी होती असे सांगणार आहे, हे ऐकून श्रद्धाच्या डोळ्यांत पाणी येणार आहे.

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

इंडियन आयडलच्या आगामी भागात स्पर्धकांचा जोश वाढवण्यासाठी वरुण धवनचे आणि श्रद्धा कपूर हजेरी लावणार आहेत. ते स्ट्रीट डान्सर 3 या त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत. या वीकएंडला या मंचावर संगीत आणि नृत्याचा सुरेख सुमेळ साधला जाणार असून प्रेक्षकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. 

अष्टपैलू अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या स्ट्रीट डान्सर 3 या आगामी चित्रपटच्या प्रमोशनसाठी इंडियन आयडलच्या मंचावर उपस्थित असताना अद्रीझ घोषच्या परफॉर्मन्सनंतर तिला एक खास व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे. या व्हिडिओमध्ये श्रद्धाची मावशी, सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेने सांगितले की, “श्रद्धा तिच्या आजोबांची, स्व. पंढरीनाथ कोल्हापुरे यांची खूप लाडकी होती आणि त्यांच्या अखेरच्या दिवसांत श्रद्धा आपली सर्व कामे सोडून त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या जवळ राहिली होती.”
 

श्रद्धा हा व्हिडिओ पाहून खूपच भावुक होणार असून तिच्या डोळ्यांत अश्रू आल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. इंडियन आयडलचा हा भाग येत्या विकेंडला प्रक्षेपित होणार असून हा भाग प्रेक्षकांना आवडेल अशी या टीमला खात्री आहे. 

Web Title: Shraddha Kapoor got emotional after Padmini Kolhapure video on Indian Idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.