Shraddha kapoor on getting married with rohan shrestha father shakti kapoor statement viral | रोहन श्रेष्ठासोबत लग्नाच्या चर्चांवर श्रद्धा कपूरने दिली प्रतिक्रिया, तर वडील शक्ती कपूर म्हणाले...

रोहन श्रेष्ठासोबत लग्नाच्या चर्चांवर श्रद्धा कपूरने दिली प्रतिक्रिया, तर वडील शक्ती कपूर म्हणाले...

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठाशी विवाहबंधनात अडकणार आहे, अशी चर्चा आहे.  यावर आता श्रद्धा कपूरकडून स्टेटमेंट आले आहे.  एका मुलाखतीत तिने सांगितले की, जास्त प्रोजेक्टमुळे ती लग्नाबद्दल विचार करत नाही आहे. ही केवळ अफवा आहे.  मात्र, रोहन हा श्रेष्ठासोबत असलेल्या रिलेशनशीपबद्दल बोलण्यास तिने नकार दिला. 

‘टाइम्स ऑफ इंडिया’ शी बोलताना श्रद्धा कपूर म्हणाली, “सध्या या सर्व गोष्टींचा विचार करण्याची माझ्याकडे वेळ नाही.  मला यावेळी फक्त चित्रपटांवर लक्ष केंद्रित करायचं आहे.  ही केवळ एक अफवा आहे.”

गेल्या वर्षी २०२० मध्ये श्रद्धा कपूरचे वडील शक्ती कपूर यांनी स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की हे सत्य नाही.  त्यांनी सांगितले होते की, श्रद्धा चार-पाच वर्षं तरी लग्न करणार नाहीये. सध्या तिच्याकडे खूप सारे प्रोजेक्ट असल्याने ती त्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. आणि सध्या तर ती कामात प्रचंड व्यग्र असून दोन वर्षं तरी तिला कोणत्याच गोष्टीसाठी वेळ नाहीये.

रोहन श्रेष्ठा हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा असून त्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सध्या रोहन श्रेष्ठा हेही फोटोग्राफी क्षेत्रातले एक मोठे नाव बनले आहे. रोहन आणि श्रद्धा एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत असून त्यांनी 2018 पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली असे म्हटले जात आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shraddha kapoor on getting married with rohan shrestha father shakti kapoor statement viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.