बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली. या चित्रपटाचे नाव आहे 'चालबाज इन लंडन'. या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. विशेष बाब म्हणजे ती यात डबल रोलमध्ये दिसणार आहे. श्रीदेवीच्या चालबाज चित्रपटातील गाण्यावर टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. श्रद्धा कपूरने आपल्या वॉलवर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे.


 १९८९ साली श्रीदेवीच्या चालबाज चित्रपटाची निर्मिती करणारे पंकज पराशर  'चालबाज इन लंडन' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर भूषण कुमार, कृष्ण कुमार, अहमद खान आणि शायरा खान या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. बागी ३ चित्रपटानंतर श्रद्धा कपूर आणि अहमद खान पुन्हा एकत्र काम करणार आहेत.


श्रद्धा कपूर 'चालबाज इन लंडन' या चित्रपटात काम करण्यास खूपच उत्सुक आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले की, मी स्वत:ला खूपच नशीबवान समजते. 'चालबाज इन लंडन'साठी त्यांनी माझी निवड केल्याने माझा आनंद द्विगुणित झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मला डबल रोल करायला मिळतो आहे. एक अभिनेत्री म्हणून मला ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडायची आहे. भूषण सर आणि अहमद सर यांच्यामुळे हे काम करताना कोणत्याच अडचणी येणार नाहीत.


तर अहमान खानने म्हटले की, 'चालबाज इन लंडन' माझ्यासाठी एक ड्रिम प्रोजेक्टसारखा आहे. श्रद्धा चांगली अभिनेत्री असून ती या चित्रपटातील भूमिका यशस्वीरित्या पार पाडेल यात शंका नाही. त्यामुळे या चित्रपटाच्या कथेसह श्रद्धाची भूमिका प्रेक्षकांना भावेल यात शंका नाही.


श्रद्धा कपूरला डबल रोलमध्ये पाहण्यासाठी आणि  'चालबाज इन लंडन' चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shraddha Kapoor announces upcoming film 'Trickster in London', will be seen in a double role for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.