बॉलिवूडमध्ये आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. या अभिनेत्रींमध्ये राधिका आपटे व कल्कि कोचलिनचाही समावेश आहे. सलमान खानसोबत वीर चित्रपटात झळकलेल्या जरीन खानने नुकतेच मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. तिने कास्टिंग काऊचबद्दल सांगितलं की, एकदा दिग्दर्शकाने तिला त्याच्यासोबत किसिंग सीनची रिहर्सल करायला सांगितली होती.

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत जरीन खानने सांगितलं की, ती जेव्हा बॉलिवूडमध्ये नवीन होती त्यावेळी दिग्दर्शकाने तिला त्याच्यासोबत किसिंग सीनची रिहर्सल करायला सांगितलं होतं. तिच्यानुसार, जेव्हा मी इंडस्ट्रीत नवीन आले होते त्यावेळी दिग्दर्शकाने त्याच्यासोबत किसिंग सीन परफॉर्म करायला सांगितला होता. त्याने सांगितलं होतं मला की, माझ्या आतमधील लज्जेला दूर करावे लागेल. मी त्याला तसे करण्यास नकार दिला.


जरीन खानने बॉलिवूडमधील करियरची सुरूवात दबंग खान सलमानच्या वीर चित्रपटातून केली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तितका प्रतिसाद मिळू शकला नाही.

गेल्या काही दिवसांमध्ये जरीन खान एका फोटोमुळे चर्चेत आली होती. या फोटोत जरीनचे स्ट्रेच मार्क दिसत होते. त्यामुळे सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल केलं होतं. त्यानंतर तिने एक पोस्ट लिहिली होती.

त्यात तिनं म्हटलं होतं की, ज्या लोकांना माझ्या पोटाला काय झालंय हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यांच्यासाठी हे आहे. हे अशा व्यक्तीचं पोट आहे जिने ५० किलोहून जास्त वजन घटविले आहे. त्यामुळे ते तसं दिसतं आहे. या फोटोचे फोटोशॉप केलेलं नाही किंवा कोणतं ऑपरेशनही केलेलं नाही.

जरीन पुढे म्हणाली की, मी सत्यावर विश्वास ठेवते. ते लपवून ठेवण्यापेक्षा माझ्यातील दोषांनाही मी स्वीकारलं आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking! Zareen Khan recalls ugly casting couch experience when a director asked to rehearse a kissing scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.