Shocking Vaani Kapoor wears bikini top with ‘Hare Ram’ printed on it; Twitterati SLAMS her | वाणी कपूरचा मोठा प्रताप, बिकनी फोटोमुळे ट्रोल झाली ही अभिनेत्री, नेटीझन्सचाही संताप अनावर

वाणी कपूरचा मोठा प्रताप, बिकनी फोटोमुळे ट्रोल झाली ही अभिनेत्री, नेटीझन्सचाही संताप अनावर

पब्लिसिटी मिळवण्यासाठी सेलिब्रेटी मंडळी कोणत्याही थराला जाऊ शकतात असाच काहीसा कारनामा केला होता. अभिनेत्री  वाणी कपूरने. सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी वाणी नेहमी तिचे फोटो शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत असते. आपल्या प्रत्येक प्रोजेक्टची माहिती चाहत्यांसह शेअर करत असते. यावेळीही तिने एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तीने राम हे नाव लिहिलेले बिकनी टॉप घातले होते. 

 


या टॉपवर प्रभू रामाचे नाव पाहून यूजर्स भडकले आणि वाणीला खूप खरी खोटी सुनावली. या फोटोमुळे वाणी सोशल मीडियावर तुफान ट्रोल झाली. अखेरीस नेटीझन्सचा संताप पाहून वाणीने ही पोस्ट डिलीट केली आहे. पण तोपर्यंत हा फोटो खूप व्हायरल झाला होता. जो अजूनही शेअर होत आहे. वाणीचे हे अशा प्रकारे वागणे चांगलेच खटकले आहे.

 

वाणी नुकतीच ऋकित रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा वॉर सिनेमात झळकली होती. या सिनेमाला रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सिनेमात वाणीच्या वाट्याला छोटीशी भूमिका आली असली तरी लक्षवेधी ठरली होती.वाणी आता स्ट्रीक्स प्रोफेशनलची ब्रँड अम्बेसेडरही बनली आहे. वॉर सिनेमानंतर आता ती समशेरा सिनेमात झळकणार आहे. समशेरा हा पीरिएड ड्रामा सिनेमा आहे.या सिनेमाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच दिग्दर्शक करण मल्होत्रा आणि रणबीर कपूरसह काम करणार आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking Vaani Kapoor wears bikini top with ‘Hare Ram’ printed on it; Twitterati SLAMS her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.