बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर हनी सिंग गाण्यांसाठी व रॅपसाठी ओळखला जातो. हनी सिंग गाण्यांसोबतच आपल्या फिटनेसचीदेखील काळजी घेतो. लॉकडाउनमध्ये हनी सिंगमध्ये खूप बदल झाला आहे. त्याचे ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो पाहून हैराण व्हाल. त्याच्या ट्रान्सफॉर्मेशन्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत त्याची मस्क्युलर बॉडी पहायला मिळते आहे.


रॅपर हनी सिंगने नुकतेच इंस्टाग्रामवर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याची मस्क्युलर बॉडी पाहून हैराण व्हाल. हनी सिंगच्या या फोटोंना खूप लाइक्स मिळत आहेत. तसेच कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

हनी सिंगच्या या फोटोंमध्ये त्याने वाढलेले वजन पूर्णपणे घटविले आहे. हे फोटो शेअर करत त्याने लिहिले की, पहा माझे लेटेस्ट बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो. लॉकडाउनमध्ये केलेली ही मेहनत.


हनी सिंगचे फोटो पाहून स्पष्ट होते आहे की लॉकडाउनमध्ये त्याने शरीरावर चांगलीच मेहनत घेतली आहे आणि वाढलेले वजन घटविले आहे. 

त्याचा ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते हैराण झाले आहेत आणि ते त्याचे खूप कौतूक करत आहे. त्याचे फॅन्सचे म्हणणे आहे की, आपल्या आवडत्या स्टारला या अंदाजात पाहून खूप खूश झालो.

एका युजरने कमेंट केली की, अभिनंदन शेरा. तर दुसऱ्या चाहत्याने म्हटले की, पुन्हा शेपमध्ये येण्यासाठी खूप मेहनतची गरज असते. अभिनंदन. शानदान काम, पुढेही असेच करत रहा.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking transformation of Honey Singh, losing weight has shocked fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.