बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल शर्लिन चोप्रा सध्या तिच्या एका विधानामुळे चर्चेत आहे. नुकताच तिने दिग्दर्शक व निर्माता राम गोपाल वर्माबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितलं की, राम गोपालने तिला अॅडल्ड फिल्मचं प्रपोजल व अश्लील व्हिडिओ पाठवले होते. तिच्या या धक्कादायक खुलासाची चर्चा होते आहे. 


स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत शर्लिन चोप्रानं सांगितलं की, २०१६ साली मी राम गोपाल वर्माला व्हॉट्सअॅपवर काही फोटो पाठवले होते आणि माझे वर्क प्रोफाईल सांगितलं होतं. त्यांना मी त्यांच्या प्रेझेंट प्रोजेक्टबद्दल विचारलं व सांगितलं की, मी तुमचे रंगीला, सत्या, कंपनी हे चित्रपट पाहिले आहेत. तुमचे सिनेमे मला आवडले आहेत. मला तुमच्या प्रोजेक्टचा हिस्सा व्हायला आवडेल.


शर्लिनच्या सांगण्यानुसार राम गोपाल वर्माने तिला अॅडल्ट चित्रपटाची स्क्रिप्ट व अश्लील व्हिडिओ पाठवले व म्हणाले की, ही माझी स्क्रीप्ट आहे आणि हा व्हिडिओ बघ व फिडबॅक दे.


पुढे शर्लिन म्हणाली की, जेव्हा मी वर्माची स्क्रीप्ट वाचली तर त्यात कोणतीच स्टोरी नव्हती. फक्त एडल्ड सीन्स होते.


शर्लिनने स्क्रीप्ट पाहून सांगितलं की, असं कसं होऊ शकतं? एक होता राजा, एक होती राणी. राजाने राणीसोबत केलं सेक्स आणि संपली स्टोरी. 


शर्लिनच्या सांगण्यानुसार राम गोपालने सांगितलं होतं की, त्याच्या स्क्रीप्टमध्ये तेच आहे जे शर्लिनला पाठवलं आहे. जर ती काम करण्यासाठी कम्फर्टेबल असेल तर त्यासोबत पुढेे जाऊ शकतो. हा चित्रपट अॅडल्ड मार्केटमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


शर्लिनला जेव्हा सायबर क्राईममध्ये तक्रार केली नाही का?, हा प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली की, वर्माने हे काम करण्यासाठी जबरदस्ती केली नव्हती आणि त्याने हे मॅसेज व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. ज्या नंबरवरून मॅसेज आले होते तो नंबर आता ती वापरत नाही.


शर्लिनने सांगितलं की, ज्या चित्रपटाची स्क्रीप्ट राम गोपाल वर्माने पाठवली होती तो चित्रपट २०१८साली प्रदर्शित झाला. यात कोणीतरी एडल्ड मुव्ही स्टार आहे.

Web Title: Shocking! Ram Gopal Varma sent this Bollywood actress a porn video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.