मल्याळम अभिनेता शेन निगम याने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने निर्माते जॉबी जॉर्ज यांच्यावर आरोप लावला आहे की हेअरस्टाईलमध्ये थोडासा बदल केल्यामुळे जॉर्जने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

शेनने इंस्टाग्रामवर लाइव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपबीती लोकांसमोर सांगितली आहे. इतकंच नाही तर त्याने असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही एक्टर्सकडेदेखील तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीत शेनने सांगितले की, चित्रपट वेयिलच्या पहिल्या शेड्युलनंतर त्याने कुर्बानी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली होती. दोन्ही चित्रपटाच्या प्रोडक्शन टीमचा सल्ला घेतल्यानंतर त्याने त्याच्या गेटअपमध्ये थोडासा बदल केला होता. त्यानंतर त्याने व्हॉट्स अॅपवर त्याच्या मेकओव्हरचे फोटो अपलोड केले होते.


प्रोड्युसर जॉबी जॉर्जने शेनचे हे मेकओव्हरचे फोटो पाहून त्याला शिव्या द्यायला लागले. त्याने आरोप केले की, त्यांचं नुकसान होईल आणि त्यांनी निगमचं जराही ऐकलं नाही. जॉर्जने हे देखील सांगितलं की, सोशल मीडियाच्या माध्यमातून शेन निगमची इमेज खराब करून टाकेन आणि निगमला जगू देणार नाही. 


शेन निगमने तक्रारीत हे देखील म्हटलं आहे की, जर त्याच्यासोबत काही वाईट घडलं तर त्याच्यासाठी जबाबदार जॉबी जॉर्जला ठरवावे.


निगमने हेदेखील सांगितलं की, महत्त्वाची कागदपत्र व व्हॉट्सएपचे स्क्रीन शॉट्स असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही एक्टर्सचे अध्यक्ष एडेवेला बाबू यांना दिले आहे. इंस्टाग्राम व्हिडिओजच्या माध्यमातून अखेर शेन म्हणाला की, त्यांना इतका प्रॉब्लेम होतोय कारण मी अभिनेता अभींचा मुलगा आहे. 


या प्रकरणी प्रतिक्रिया देताना जॉर्जने फेसबुकवर पोस्ट लिहिली आणि निगमने लावलेले सगळे आरोप निराधार आणि चुकीचं असल्याचं सांगितलं. पुढे म्हणाले, सत्य माझ्या बाजूने आहे. याप्रकरमी प्रो़ड्युसर असोसिएशन लवकर याप्रकरणी आपले मत मांडेल.


शेन निगम हा स्वर्गीय अभिनेते अभी यांचा मुलगा आहे आणि त्याला काही चित्रपटासाठी गौरविण्यात आलं आहे. 


Web Title: Shocking! Malyalam actor shane nigam was threatened by a producer just because of his changing hairstyle
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.