Shocking! I have been persecuted forever, serious allegations against the family of Nawazuddin Siddiqui's wife TJL | Shocking ! माझ्यासोबत कायम छळ करण्यात आलाय, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायकोचे कुटुंबियांवर गंभीर आरोप

Shocking ! माझ्यासोबत कायम छळ करण्यात आलाय, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायकोचे कुटुंबियांवर गंभीर आरोप

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आला आहे. सातत्याने त्याच्या व त्याची पत्नी आलियाच्या घटस्फोटाचे वृत्त समोर आले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने त्याला व्हॉट्स अॅप आणि ईमेलवर घटस्फोटाची लीगल नोटीस पाठवून सगळ्यांना चकीत केले आहे. आलियाने काही प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत नवाज व त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केला आहे.


नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांच्या लग्नाला जवळपास दहा वर्षे झाले आहे. दहा वर्षानंतर आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत वेगळा होण्याचा निर्णय घेतला. आलियाचा दावा आहे की नवाज तिचा व तिच्या मुलांची काळजी घेत नाही. त्यांचे नाते चांगले नाही आहे त्यामुळे नाते आणखीन ताणण्यापेक्षा संपवण्यासाठी लाचार झाली. आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकीला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे पण आतापर्यंत त्याचे अद्याप उत्तर आले नाही.


त्यामुळे नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने सोशल मीडियाचा आसरा घेतला आहे. आलियाने ट्विटरवर म्हटले की, मी सत्य ट्विटरच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणण्यासाठी लाचार आहे. कारण कोणते मिस कम्युनिकेशन होऊ नये. सत्य पावरचा वापर करून नष्ट करू नये असे मला वाटते. कारण सत्य आपल्या हिशोबाने तोडता मोडता येत नाही.बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत आलिया सिद्दीकीने सांगितले की, आमच्या नात्यात समस्या खूप आधीपासून सुरू होत्या. जेव्हापासून मी नवाजसोबत लग्न केले होते. पण मी कधीच याबद्दल बोलले नाही. मी या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. गोष्टी सुरळीत होण्याची वाट पाहिली. पण अखेर मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. इथे बरीच कारणे आहेत ज्यामुळे मला हे पाऊल उचलावे लागले. माझा आत्मसन्मान पूर्णपणे संपला आहे. ज्याप्रमाणे घरात तुमचे पालनपोषण होते. तुमची आई व भाऊ तुमची काळजी घेतात. मग तुम्हाला धर्म बदलायला सांगतात. हे लग्नासाठी गरजेचे होते. म्हणून मी केले.


आलिया सिद्दीकीने पुढे सांगितले की, लवकरच तुमचे जीवन बदलून जाते. मला तुम्हाला कळतं की तुमच्या जीवनात काहीच नाही. तुम्ही फक्त दहा वर्षांच्या मुलासोबत एकटे राहत आहात. सर्व गोष्टी एकट्याने कराव्या लागतात. त्यामुळे मी सगळं काही संपवण्याचा निर्णय घेतला. जर सगळ्या गोष्टी मी एकटी करते आहे मग एकटी का नको राहू. नवाजने कधीच माझ्यावर हात उचलला नाही. पण ओरडणे आणि भांडणे माझ्या सहनशक्तीच्या बाहेर गेले होते. त्याच्या कुटुंबाने माझा खूप शारीरिक व मानसिक छळ केला आहे. त्याच्या भावाने मला मारलेदेखील आहे. त्याची आई व भाऊ आमच्यासोबत मुंबईत राहत होते. मी खूप वर्षे बरेच काही सहन केले आहे.


आलियाने नवाजच्या पहिल्या पत्नीबद्दलही सांगितले. ती म्हणाली की, पहिल्या पत्नीने पण यासाठीच सोडले होते. या कुटुंबाच्या विरोधात अशा सात केस दाखल आहेत आणि चार घटस्फोट झाले आहेत. हा पाचवा आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking! I have been persecuted forever, serious allegations against the family of Nawazuddin Siddiqui's wife TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.