Shocking! मोठे झालेले ओठ...सुजलेले गाल...शाहिद कपूरची पत्नी मीराचा लूक पाहून चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 05:45 PM2021-07-24T17:45:17+5:302021-07-24T17:45:36+5:30

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कपूर इंस्टाग्रामवरील व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

Shocking! Enlarged lips ... swollen cheeks ... Fans were shocked to see the look of Shahid Kapoor's wife Meera | Shocking! मोठे झालेले ओठ...सुजलेले गाल...शाहिद कपूरची पत्नी मीराचा लूक पाहून चाहते झाले हैराण

Shocking! मोठे झालेले ओठ...सुजलेले गाल...शाहिद कपूरची पत्नी मीराचा लूक पाहून चाहते झाले हैराण

Next

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कपूर भलेही सिनेइंडस्ट्रीत कार्यरत नसली तरी ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.  तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओतील तिचा लूक पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

मीरा कपूर तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. बऱ्याचदा ती इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. मात्र नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ पाहून सर्व हैराण झाले आहेत. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओत लिप सर्जरी केल्याचे पहायला मिळते. या सर्जरीमुळे तिच्या ओठांचा आकारच बदलला आहे आणि गाल सुजलेले दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर येताच अनेकांनी कमेंट करत तिला लिप सर्जरी का केली? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. मीराचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


खरेतर मीरा राजपूत कपूरने आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची सर्जरी केलेली नाही. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओत तिचा लूक वेगळा दिसतो आहे मात्र या व्हिडिओच्या शेवटी तिचा सध्याचा ग्लोईंग लूक तिने शेअर केला आहे.

तिने या व्हिडिओत इंस्टाग्रामचा एक फिल्टर वापरला आहे. ज्यामुळे तिचा चेहरा पाहून अनेकजण हैराण झाले होते. तिने या व्हिडिओत त्वचेच्या काळजी घेण्यासंदर्भातील टिप्स शेअर केल्या आहेत.


शाहिद कपूर आणि मीरा यांनी २०१५ मध्ये लग्न केले . त्यांना दोन मुले आहेत मीशा आणि जैन.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking! Enlarged lips ... swollen cheeks ... Fans were shocked to see the look of Shahid Kapoor's wife Meera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app