ठळक मुद्देकिशन कन्हैया या चित्रपटातील तिच्या बोल्ड लूकची चांगलीच चर्चा रंगली होती. या चित्रपटातील राधा बिना या गाण्यात तिने ट्रान्सफरन्ट साडी घातली होती. 

शिल्पा शिरोडकरने नव्वदीच्या दशकात भ्रष्टाचार, योद्धा, हम, आँखे, गोपी किशनसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. शिल्पा 2000 नंतर चित्रपटांपासून दूर होती. पण 13 वर्षांनंतर ती अभिनय क्षेत्राकडे परतली. तिने एक मुठ्ठी आसमान या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने सिलसिला प्यार का या मालिकेत गेल्या वर्षी काम केले. या मालिकेतील तिच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. पण गेल्या काही वर्षांत शिल्पा इतकी बदलली आहे की, तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. आज शिल्पाचा वाढदिवस असून तिच्याविषयी आम्ही काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.

शिल्पाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 90 च्या दशकात केली. तिची आजी मिनाक्षी शिरोडकर या प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने तिला लहानपणासूनच या क्षेत्राविषयी आकर्षण वाटू लागले होते. शिल्पाने 1989 ला भ्रष्टाचार या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात ती मिथुन चक्रवर्तीच्या नायिकेच्या भूमिकेत झळकली होती. त्यानंतर ती किशन कन्हैया या चित्रपटात झळकली. या चित्रपटातील तिच्या बोल्ड लूकची चांगलीच चर्चा रंगली होती. या चित्रपटातील राधा बिना या गाण्यात तिने ट्रान्सफरन्ट साडी घातली होती. 

शिल्पाने तिच्या कारकिर्दीत अमिताभ बच्चन, गोविंदा, मिथुन, सुनील शेट्टी, अक्षय कुमार यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले. पण तिला म्हणावे तसे बॉलिवूडमध्ये यश मिळाले नाही. शिल्पाने 2000 मध्ये युकेतील अपरेश रंजीत या बँकरसोबत लग्न केले. शिल्पा लग्नानंतर लंडनमध्येच राहायला लागली. त्यांना एक मुलगी असून तिचे फोटो आपल्याला शिल्पाच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shilpa shirodkar bold scene in Kishen Kanhaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.