ठळक मुद्देशिल्पाची आई सुनंदा शेट्टी या ज्योतिषी असून त्यांनीच शिल्पाला नाव बदलण्याविषयी काही वर्षांपूर्वी सुचवले होते. अंकशास्त्रानुसार अश्विनीपेक्षा शिल्पा हे नाव तिच्या प्रगतीसाठी योग्य ठरेल असे सुनंदा यांचे म्हणणे होते.

शिल्पा शेट्टीचे खरे नाव शिल्पा नाहीये हे तुम्हाला माहीत आहे का? हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हे खरे आहे शिल्पाचे खरे नाव दुसरे असून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधी काही वर्षांपूर्वीच तिचे नाव बदलले होते.

शिल्पाचे खरे नाव हे अश्विनी असून शिल्पाने तिच्या आईच्या सांगण्यावरून तिचे नाव बदलले होते, शिल्पाने तिचे नाव का बदलले यामागे देखील एक खास कारण आहे. शिल्पाची आई सुनंदा शेट्टी या ज्योतिषी असून त्यांनीच शिल्पाला नाव बदलण्याविषयी काही वर्षांपूर्वी सुचवले होते. अंकशास्त्रानुसार अश्विनीपेक्षा शिल्पा हे नाव तिच्या प्रगतीसाठी योग्य ठरेल असे सुनंदा यांचे म्हणणे असल्याने शिल्पाने चित्रपटसृष्टीत येण्याआधीच तिचे नाव बदलले होते. पण आजही शिल्पाचे पासपोर्ट तसेच काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर तिचे नाव हे अश्विनी असेच आहे.

शिल्पा शेट्टीने बाजीगर या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने त्यानंतर एकाहून एक हिट चित्रपट दिले. तिने धडकन, रिश्ते, गर्व, मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने मोठ्या पडद्यानंतर छोट्या पडद्यावर देखील तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. सुपर डान्सरमधील सुपर से उपर बोलण्याची तिची अदा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या कार्यक्रमाचा तिसरा सिझन काही महिन्यांपूर्वी संपला आहे. या कार्यक्रमातील तिचा अंदाज तिच्या प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. 

शिल्पा गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. दरम्यानच्या काळात दोस्ताना यांसारख्या काही चित्रपटात ती आयटम साँगवर थिरकली होती. पण २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या लाईफ इन मेट्रो आणि अपने चित्रपटानंतर ती कोणत्याच चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली नव्हती. पण ती लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. शिल्पा निकम्मा या चित्रपटाद्वारे कमबॅक करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन सब्बीर खान करणार आहे. शिल्पा तिच्या कमबॅकसाठी प्रचंड उत्सुक आहे. 


Web Title: This is Shilpa Shetty's real name ... for this reason she changed her name to Shilpa
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.