ठळक मुद्देशिल्पा सांगते, "आम्ही बाजीगरसाठी शूटिंग करत होतो, तेव्हा मला 'काली काली आँखे' या गाण्याचा एक भाग व्हायचे होते. परंतु माझ्याऐवजी काजोलवर हे गाणे चित्रीत करण्याचे ठरले. त्यावेळी मला तिचा खूप राग आला होता.

शाहरुख खान, काजोल आणि शिल्पा शेट्टी यांची मुख्य भूमिका असलेला बाजीगर हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील सगळ्यांच्याच अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले होते. या चित्रपटातील सगळीच गाणी देखील गाजली होती. हा चित्रपट 12 नोव्हेंबर 1993 ला प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज 16 वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये.

बाजीगर या चित्रपटात शिल्पा शेट्टी आणि काजोल यांच्या दोघांच्याही मुख्य भूमिका होत्या. पण तरीही या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी शिल्पा शेट्टीला काजोलचा प्रचंड राग आला होता. शिल्पानेच हा किस्सा सुपर डान्सर 3 या कार्यक्रमात सांगितला होता. हा किस्सा ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. 

बाजीगर या चित्रपटातील काली काली आँखे हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते. या चित्रपटातील हे गाणे या चित्रपटाच्या सगळ्याच टीमला प्रचंड आवडले होते. शिल्पाचा हा पहिलाच चित्रपट असल्याने काली काली आँखे या गाण्यावर आपल्याला नृत्य करायला मिळावे असे तिला वाटत होते. तिनेच याविषयी सुपर डान्सर मध्ये सांगितले होते. शिल्पा सांगते, "आम्ही बाजीगरसाठी शूटिंग करत होतो, तेव्हा मला 'काली काली आँखे' या गाण्याचा एक भाग व्हायचे होते. परंतु माझ्याऐवजी काजोलवर हे गाणे चित्रीत करण्याचे ठरले. त्यावेळी मला तिचा खूप राग आला होता. कारण काजोलचे डोळे काळे नसताना देखील काली काली आँखे तिच्यावर कसे चित्रीत होऊ शकते असा मला प्रश्न पडला होता.

बाजीगर या चित्रपटातील काली काली आँखे हे गाणे इतके गाजले की, आजही या गाण्यावर लोकांना नृत्य करायला आवडते.

Web Title: Shilpa Shetty Was Upset With Kajol During The baazigar shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.