शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या कुटुंबीयासोबतचे व्हिडीओ शिल्पा शेअर करत असते. नुकताच शिल्पाने आपल्या मुलासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत शिल्पाचा मुलगा वियान तिचे पाय दाबताना दिसतोय.  शिल्पा या व्हिडीओत वियान पाय दाबून देण्याच्या बदल्यात केक देणार म्हणून.  

शिल्पाने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले, मला माहिती नव्हते की माझी आई हा व्हिडीओ शूट करते आहे. पण तिने एक क्युट क्षण कॅमेऱ्यात कैद केला आहे. या व्हिडीओ बघितल्यावर जाणीव झाली की मुलं असणं किती भाग्याची गोष्ट असते. मी खूप भाग्यवान आहे की मला वियान मिळाला जो इतका समजूतदार आणि संवेदनशील आहे.' शिल्पाच्या फॅन्सना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. 

कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी शिल्पाने पंतप्रधान सहाय्यता निधीत 21 लाख रुपयांची मदत केली आहे. तिनेच ट्वीट करून ही माहिती तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. तिने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, मी माझ्या परिने मदत केली असून आज एक छोटीशी मदत देखील गरजेची आहे. प्रत्येकाने पुढे येऊन मदत करावी असे मी सगळ्यांना आवाहन करेन... आपण सगळ्यांनी मिळून या परिस्थितीला तोंड देऊया... असे ट्विट शिल्पाने केले होते. 

शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या कुटुंबीयासोबतचे व्हिडीओ शिल्पा शेअर करत असते. नुकताच शिल्पाने आपल्या मुलासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत शिल्पाचा मुलगा वियान तिचे पाय दाबताना दिसतोय.  शिल्पा या व्हिडीओत वियान पाय दाबून देण्याच्या बदल्यात केक देणार म्हणून.  

शिल्पाने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले, मला माहिती नव्हते की माझी आई हा व्हिडीओ शूट करते आहे. पण तिने एक क्युट क्षण कॅमेऱ्यात कैद केला आहे. या व्हिडीओ बघितल्यावर जाणीव झाली की मुलं असणं किती भाग्याची गोष्ट असते. मी खूप भाग्यवान आहे की मला वियान मिळाला जो इतका समजूतदार आणि संवेदनशील आहे.' शिल्पाच्या फॅन्सना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. 

कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी शिल्पाने पंतप्रधान सहाय्यता निधीत 21 लाख रुपयांची मदत केली आहे. तिनेच ट्वीट करून ही माहिती तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. तिने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, मी माझ्या परिने मदत केली असून आज एक छोटीशी मदत देखील गरजेची आहे. प्रत्येकाने पुढे येऊन मदत करावी असे मी सगळ्यांना आवाहन करेन... आपण सगळ्यांनी मिळून या परिस्थितीला तोंड देऊया... अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर शिल्पाने केली होती. 

Web Title: Shilpa shetty son give her massage amid lockdown watch video gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.