कोरोना व्हायरसने आज सर्व सेलिब्रिटींना घरी बसण्यास भाग पाडले आहे. घरी बसून ते काय करणार? तुमच्या-आमच्याप्रमाणेच व्हिडीओ बनवणार आणि सोशल मीडियावर पोस्ट करणार. होय, हे अगदी खरे आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने तिचा पती राज कुंद्रा यांच्यासोबत एक टिक टॉक व्हिडीओ शूट केला आहे. तो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहाल, तर अक्षरश: हसून हसून लोटपोट व्हाल, यात काही शंकाच नाही. तुमच्यासाठी खास हा व्हिडीओ...

 शिल्पा शेट्टी ही कायम सोशल मीडियावर तिच्या फॅन्ससोबत संपर्कात असते. आता सध्या लॉकडाऊन असल्याने तिने फॅन्ससोबत कनेक्टेड राहण्यासाठी पती राज कुं द्रा याच्यासोबत एक ‘फ्लिप द स्विच’ हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात दोघेही एकदम मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. पहिल्यांदा ते दोघेही आपापल्या ड्रेसिंगमध्ये दिसत आहेत. नंतर ते त्यांचा लूक बदलताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओला प्रचंड लाईक्स येताना दिसत आहेत. 

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. सध्या महाराष्ट्रात २१ दिवस लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे बॉलिवूड सेलिब्रिटीही आपापल्या घरात बंदिस्त झाले आहेत. अशातच सगळे सेलिब्रिटी आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. वेळ घालवण्यासाठी हे सेलिब्रिटी वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटोज शेअर करत आहेत. 

 

Web Title: Shilpa Shetty shares a tick talk video with husband Raj Kundra; See you too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.