लव्ह इन कोरोना...! ‘कोरोना पॉझिटीव्ह’ पतीसोबत शिल्पा शेट्टीचा अनोखा रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 06:16 PM2021-05-16T18:16:52+5:302021-05-16T18:18:39+5:30

शिल्पाने राज कुंद्रासोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. तिने शेअर केलेला हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय.

shilpa shetty shares romantic picture with raj kundra with glass wall between-them | लव्ह इन कोरोना...! ‘कोरोना पॉझिटीव्ह’ पतीसोबत शिल्पा शेट्टीचा अनोखा रोमान्स

लव्ह इन कोरोना...! ‘कोरोना पॉझिटीव्ह’ पतीसोबत शिल्पा शेट्टीचा अनोखा रोमान्स

Next
ठळक मुद्देशिल्पा शेट्टीने ‘बाजीगर’ या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे ( Shilpa Shetty) अख्खे कुटुंब सध्या कोरोनाशी लढतेय. शिल्पा शेट्टीचा पती, सासू-सासरे, शिवाय मुलगा वियान आणि मुलगी समीशा सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी स्वत: शिल्पाने सोशल मीडियावर याची माहिती दिली होती. आता शिल्पाने राज कुंद्रासोबतचा ( Raj Kundra) एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. तिने शेअर केलेला हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय.
या फोटोत शिल्पा व राज दोघेही दिसत आहेत. पण मध्ये काचेची भींत आहे. होय, राज अद्याप आयसोलेशनमध्ये आहे. साहजिकच शिल्पा व त्याची प्रत्यक्ष भेट दुर्मिळ झाली आहे. पण काचेआडून का होईना, त्यांचे प्रेम तितकेच ताजे टवटवीत दिसतेय.

हा फोटो शेअर करताना शिल्पाने सुंदर कॅप्शनही दिले आहे. कोरोना काळात प्रेम, हे कोरोना प्रेम आहे, असे तिने लिहिलेय. शिवाय  शुभेच्छा व प्रार्थनांसाठी सर्वांचे आभारही मानले आहेत. या कॅप्शनमध्ये शिल्पाने #Nearlydone असा हॅशटॅग दिला आहे. याचा अर्थ राजची प्रकृती आता जवळपास ठीक झाली आहे. त्याचा क्वारंटाईन पीरियड लवकरच संपणार आहे.

 राज आणि शिल्पा यांची एका परफ्यूमच्या प्रमोशनच्या निमित्ताने भेट झाली होती. त्यानंतर ते दोघे बिझनेस पार्टनर बनले. त्यानंतर शिल्पा आणि राजच्या प्रेमकथेची चर्चा  मीडियात सुरू झाली होती. राज विवाहित होता. त्यामुळे पत्नी कविताला राजने घटस्फोटाची नोटिस दिली होती.   राज आणि कविता यांचा घटस्फोट झाल्यानंतर काहीच महिन्यात शिल्पा आणि राज यांनी लग्न केले.

शिल्पा शेट्टीने ‘बाजीगर’ या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने त्यानंतर एकाहून एक हिट चित्रपट दिले. तिने धडकन, रिश्ते, गर्व, मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने मोठ्या पडद्यानंतर छोट्या पडद्यावर देखील तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. सुपर डान्सरमधील सुपर से उपर बोलण्याची तिची अदा प्रेक्षकांना प्रचंड आवडते.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shilpa shetty shares romantic picture with raj kundra with glass wall between-them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app