ठळक मुद्देद मॅन चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या तारखा सतत बदलत असल्याने राजने मला अल्टीमेटम दिले होते की, लग्न कर अथवा ब्रेकअप कर... मला त्यावेळी दोन मॅनच्या मध्ये एकाची निवड करायची होती.

शिल्पा शेट्टीने बाजीगर या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने त्यानंतर एकाहून एक हिट चित्रपट दिले. तिचा धडकन, रिश्ते, गर्व, मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने मोठ्या पडद्यानंतर छोट्या पडद्यावर देखील तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. सुपर डान्सरमधील सुपर से उपर बोलण्याची तिची अदा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या कार्यक्रमाचा तिसरा सिझन नुकताच संपला आहे. 

शिल्पाचे लग्न राज कुंद्रासोबत झाले असून त्यांना एक मुलगा आहे. राज हा प्रसिद्ध बिझनेसमन असून राज आणि शिल्पा हे बॉलिवूडमधील एक क्यूट कपल मानले जाते. शिल्पा आणि राज कुंद्राच्या नात्याविषयी नुकत्याच काही गोष्टी शिल्पाने बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्या आहेत. तिने म्हटले आहे की, मी सतरा वर्षांची असताना इंडस्ट्रीत आले आणि ३२ वर्षांची असताना माझे लग्न झाले. मी त्यावेळी लग्न करण्यास उत्सुक होती. मला लग्न करून एका गोंडस बाळाला जन्म द्यायचा होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण माझे विचार एका सामान्य मुलीप्रमाणे आहेत.

मी करियरच्याआधी घर आणि मूल यांचा विचार करते. मी लग्न केले त्यावेळी माझे करियर खूपच चांगले सुरू होते. मी अनेक हिट चित्रपट दिले होते. तसेच बिग ब्रदरमुळे मला जगभरात लोकप्रियता मिळाली होती. मी द मॅन या चित्रपटाचे त्यावेळी चित्रीकरण करत होती. या चित्रपटात माझ्यासोबत सनी देओल मुख्य भूमिकेत होता. त्यावेळी चित्रीकरणाच्या तारखा सतत बदलत होत्या. त्यामुळे लग्न कधी करायचे असा प्रश्न उभा ठाकला होता. शेवटी राजने मला अल्टीमेटम दिले होते की, लग्न कर अथवा ब्रेकअप कर... मला त्यावेळी दोन मॅनच्या मध्ये एकाची निवड करायची होती.

काही कारणास्तव द मॅन हा चित्रपट झालाच नाही आणि मी माझ्या मॅनची निवड केली आणि लग्नबंधनात अडकली. मला त्यावेळी ब्रिटीश टीव्ही सिरिजमध्ये देखील काम करण्याची संधी होती. पण मी करियर आणि नाते याच्यात करियरची निवड केली.

 


Web Title: Shilpa Shetty Reveals The Time When She Had Received An Ultimatum About Her Marriage From Raj Kundra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.