ठळक मुद्देलवकरच शिल्पा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार, अशी चर्चा आहे. अर्थात अद्याप तिने याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसमुळे कायम चर्चेत असते. तिचे डाएट, तिचे वर्कआऊट या सगळ्यांचीच बातमी होती. काही दिवसांपूर्वी शिल्पाने तिचे फिटनेस अ‍ॅप लॉन्च केले. याद्वारे आपल्या चाहत्यांना ती सतत फिट राहण्याचा सल्ला देते. पण म्हणून फिटनेसच्या नावाखाली चाहत्यांना चुकीचा सल्ला देणे, त्यांना भुलवणे शिल्पाला मान्य नाही. होय, याचमुळे  शिल्पाने चक्क 10 कोटी रुपयांची एक जाहिरात नाकारल्याचे कळतेय.


सूत्रांचे मानाल तर एका आयुर्वेदिक कंपनीने शिल्पाला त्यांच्या स्लिमिंग पिलच्या जाहिरातीसाठी 10कोटींची  ऑफर दिली होती. करिअरच्या या टप्प्यावर 10 कोटींची  ऑफर शिल्पासाठी महत्त्वपूर्ण होती. मात्र शिल्पाने ही  ऑफरर शिल्पाने धुडकावून लावली. यामागचे कारण नुकतेच तिने सांगितले. 


‘ज्या गोष्टीवर माझा विश्वास नाही त्या गोष्टी मी विकू शकत नाही. या स्लिमिंग पिल्स आणि फेड डाएट्स लगेच परिणाम दाखवण्याचा दावा करतात. मात्र हे लोकांना भूलवण्यासाठी असू शकते. कोणत्याही पिल्स योग्य डाएट आणि चांगल्या व्यायामाला मात देऊ शकत नाही. त्यामुळे लोकांना भूलवणा-या जाहिराती मला करायच्या नाहीत’, असे शिल्पाने सांगितले.


दीर्घकाळापासून शिल्पा फिल्म इंडिस्ट्रीपासून दूर आहे. शिल्पा अखेरची सनी, बॉबी देओल व धर्मेन्द्रच्या चित्रपटात झळकली होती. लवकरच शिल्पा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार, अशी चर्चा आहे. अर्थात अद्याप तिने याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही. अलीकडे ‘सुपर डान्सर’  या रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्ये  परिक्षक म्हणून ती दिसली होती.


Web Title: shilpa shetty refuses to endorse a slimming pill rs 10 crore
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.