ठळक मुद्दे शिल्पा आणि राज यांची ही मुलगी सरोगसीच्या माध्यमातून झालेली आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरी एका नन्ही परीचे आगमन झाले आहे. शिल्पा आणि राजनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांना सांगितली आहे. शिल्पा आणि राज यांना 15 फेब्रुवारीला मुलगी झाली असून हे त्यांचे दुसरे अपत्य आहे. शिल्पा आणि राज यांची ही मुलगी सरोगसीच्या माध्यमातून झालेली आहे.

शिल्पाने इन्स्टाग्रामवर या नन्ही परीचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, देवाने आमच्या प्रार्थना ऐकल्या असून आमच्या आयुष्यात एक चमत्कार घडला आहे. आम्हाला सगळ्यांना आनंद होत आहे की, आमच्या आयुष्यात एका नन्ही परीचे आगमन झाले आहे. तिचे नाव आम्ही समिशा शेट्टी कुंद्रा असे ठेवले आहे. तिचा जन्म 15 फेब्रुवारी 2020 ला झाला असून आमच्या घरात आता ज्युनिअर एसएसके आली आहे.

राज कुंद्राने ट्वीट करत सांगितले आहे की, ही बातमी सांगायला मला किती आनंद होत आहे हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आमच्या घरात एका नव्या सदस्याचे आगमन झाले असून आमच्या मुलीचे नाव समीशा शेट्टी कुंद्रा असे आहे.

शिल्पा आणि राज यांचे लग्न नोव्हेंबर 2009 मध्ये झाले. त्यांना वियान नावाचा मुलगा असून मे 2012 मध्ये त्याचा जन्म झाला आहे. 

Read in English

Web Title: Shilpa Shetty, Raj Kundra welcome daughter through surrogacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.