बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा आई झाली, या वृत्ताने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर खळबळ माजली होती. शिल्पा शेट्टीला यापूर्वी एक मुलगा आहे. त्याचं नाव आहे वियान. वियाननंतर आता शिल्पाच्या घरी छोट्या चिमुकलीचं आगमन झालं आहे. शिल्पाने या मुलीचं नाव समीशा ठेवलं आहे.


 काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी मुंबई एअरपोर्टवर आपल्या मुलीसोबत पोझ देताना दिसली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा नवरा राज कुंद्रा व बाकीचं कुटुंब पहायला मिळाले होते.


 खरेतर शिल्पा शेट्टी सरोगेसीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आई झाली आहे. मुलीच्या जन्मानंतर होळीच्या दिवशी ती तिला घरी घेऊन गेली आहे. हे वृत्त समोर आल्यावर कित्येक दिवस शिल्पा चर्चेत आली होती.


शिल्पाने मुलीसोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत शिल्पा आपल्या लहान मुलीचा हात पकडलेला दिसते आहे. यासोबतच राज कुंद्रा व तिचा मुलगा वियान कुंद्रादेखील दिसतो आहे. या चौघांच्या हातांनी हा फोटो कम्प्लिट केला आहे.

 शिल्पाचे चाहते या फोटोनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर पहिला फॅमिली फोटो असल्याचं सांगत आहेत. आपला आनंद व्यक्त करत शिल्पा शेट्टीने हा फोटो शेअर करत म्हटलं की, तू तुझ्या जीवनातील पहिला टप्पा यशस्वीपणे पार पाडला आहेस. आज तू एक महिन्यांची झाली आहेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. समीशा, तू आहेस माझी राजकुमारी.


शिल्पा शेट्टीच्या यो पोस्टवरून हे स्पष्ट दिसतंय की, लेक एक महिन्याची झाल्यामुळे शिल्पा खूप आनंदी आहे. तिच्या या पोस्टला लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

Web Title: Shilpa Shetty Kundra shares first adorable picture of her daughter Samisha Tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.