अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिची बहीण शमिता शेट्टीच्या खूप क्लोज आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखती शिल्पाने आपल्या बहिणीबद्दल अनेक खुलासे केले आहेत. शिल्पा म्हणाली, '' शमिताचा जन्म झाल्यानंतर मला नेहमीच वाटायचं की माझा रंग तिच्यापेक्षा जास्त डार्क आहे. हे माझ्या वडिलांनी मला सांगितले. तिच्या गोऱ्या रंगामुळे मी नेहमीच अनकम्फर्टेबल असायचे आणि आईला नेहमीच विचारायचे तिला गोरे केलं आणि मला काळं का केलं?. जेव्हा रात्री शमिता झोपायची मी जाऊन तिला चिमटा काढायचे आणि मग ती जोरात रडायची.''


शिल्पा पुढे म्हणाली, मी तिच्या पहिल्या ऑडिशनच्यावेळी तिच्यासोबत होते पण घाबरलेले होते. मला नेहमीच असं वाटायचे की ती माझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसते. शमिताच्या डेब्यूनंतर तिला काम मिळणार नाही असे शिल्पाला वाटायचे. 


काही दिवसांपूर्वीच शिल्पाच्या घरी नन्ही परीचे आगमन झाले आहे. शिल्पा आणि राज यांना 15 फेब्रुवारीला मुलगी झाली असून हे त्यांचे दुसरे अपत्य आहे. शिल्पा आणि राज यांची ही मुलगी सरोगसीच्या माध्यमातून झालेली आहे. तिचं नाव समिशा शेट्टी कुंद्रा असे ठेवण्यात आले आहे. 

Web Title: Shilpa shetty confesses being insecure of sister shamita shetty due to her fair complexion gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.