बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेससोबत स्टाईल व फॅशन स्टेटमेंटने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. वाढत्या वयासोबत ती आणखीन सुंदर होत चालली. नेहमी फिटनेसमुळे चर्चेत राहणारी शिल्पा यावेळी महागड्या बॅगमुळे चर्चेत आली आहे. या बॅगेची किंमत वाचून तुम्ही हैराण व्हाल.


शिल्पा शेट्टी काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर दिसली होती. यावेळी तिने ब्राउन रंगाच्या स्टायलिश आउटफीटमध्ये दिसली होती. मात्र यावेळी तिच्या हातातील बॅगेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. 
शिल्पाच्या हातातील ही बॅग हर्मेस बर्किन या ब्रॅण्डची असून ही बॅग खूप महागडी आहे. या बॅगेची किंमत जवळपास १० लाख रुपये पासून सुरु होते. 


शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर सध्या ती निकम्मा आणि हंगामा २ या चित्रपटामुळे खूप चर्चेमध्ये आहे. हे दोन्ही चित्रपट याच वर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत.

‘हंगामा २’ या चित्रपटात शिल्पा पुन्हा एकदा ‘चुरा के दिल मेरा’ या तिच्या सदाबहार गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. हे गाणे आधी शिल्पा आणि अक्षय कुमार यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. शिल्पा जितकी २५ वर्षांपूर्वी मोहक दिसत होती तशीच ती आजही मिझान जेफरीसोबत हे गाणे सादर करताना दिसत आहे अशी कपिलने शिल्पाची प्रशंसा केली.

त्यावर शिल्पा म्हणाली, ‘मैं खिलाडी तू अनाडी’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तिचा सहकलाकार मिझान याचा जन्मदेखील झाला नव्हता. मला त्याच्यासोबत काम करायचे आहे हे जेव्हा कळले तेव्हा त्याच्या एनर्जीसोबत मॅच करणे खूप कठीण असल्याची जाणीव मला झाली होती. तरीही मिझान आणि विशेषतः परेश रावल यांच्यासोबत काम करायला मजा आली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shilpa Shetty In Airport With Expensive Bag Worth 10 Lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.