गेल्या अनेक दिवसांपासून फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर खुल्लेआम रोमान्स करताना दिसत असतात. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचे प्रेम कुणापासून लपून राहिलेले नाही. दोघे सतत व्हेकेशन , पार्टी आणि इव्हेंटसला एकत्र दिसतात. शिबानी आणि फरहान गेल्या एका वर्षांपासून जास्त एकमेकांना डेट करत आहेत. फरहान अख्तर व शिबानी दांडेकर हे दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात आणि एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करत असतात. फरहानने तर कित्येक वेळा शिबानीसोबतच्या रिलेशनशीपबद्दल सोशल मीडियावर फोटो शेअर करून जाहीर केले आहे. मात्र आता जो फोटो शिबानीने शेअर केला आहे तो बघून कदाचित फरहान अख्तरच्या मनात शंका उपस्थित होऊ शकते.

या फोटोत शिबानीच्या मांडिवर एक व्यक्ति बसलेला दिसतोय आणि शिबानीने त्याला मागून मिठ्ठी मारलेली दिसतेय. असे गोंधळून जाऊ नका शिबानीच्या मांडीवर बसलेला व्यक्ति अभिनेता आणि अँकर समीर कोचर आहे.  शिबानी आणि समीर एकत्र एका शोमध्ये दिसणार आहेत. 


फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्याने पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुलं आहेत. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासून फरहान आणि शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती. 


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर  फरहान ‘द स्काज इज पिंक’या सिनेमात दिसणार आहे.  सोनाली बोस दिग्दर्शित या सिनेमात प्रियांका चोप्रा आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत. 
 


Web Title: Shibani Dandekar and Samir Kochhar get candid
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.