IMDB वर सर्वोच्च स्थानावर 'शेरशाह' चित्रपट विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 10:43 AM2021-08-14T10:43:31+5:302021-08-14T10:44:41+5:30

शेरशाह चित्रपट पाहिल्यानंतर लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, एवढेच नाही तर चित्रपटाच्या गाण्यांचे आणि ट्रेलरला देखील सर्वाधिक ऑनलाइन सर्च केले जात आहे.

Shershaah Movie tops IMDB rating, check the rating heere | IMDB वर सर्वोच्च स्थानावर 'शेरशाह' चित्रपट विराजमान

IMDB वर सर्वोच्च स्थानावर 'शेरशाह' चित्रपट विराजमान

Next

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीच्या 'शेरशाह' चित्रपटावर जगभरातून प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  8.8 च्या आयएमडीबी रेटिंगसह संपूर्ण टीमच्या प्रयत्नांच्या कष्टाचे चिज झाल्याचे दिसून येते .अमेझॉन प्राइम आणि धर्मा प्रॉडक्शन्सच्या मार्केटिंग टीमने अनेक प्रकारे जाहिरात करून चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच लोकप्रिय बनवण्याचे एक विलक्षण कार्य केले आहे. कोणत्याही ओटीटी रिलीजसाठी यापूर्वी असे कधीच केले गेले नाही. यामुळे प्रेक्षकांना उत्साही होण्यास आणि चित्रपट प्रदर्शित होताच जास्तीत जास्त संख्येने पाहण्यास मदत झाली.  


चित्रपट पाहिल्यानंतर लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, एवढेच नाही तर चित्रपटाच्या गाण्यांचे आणि  ट्रेलरला देखील सर्वाधिक ऑनलाइन सर्च केले जात आहे. स्वातंत्र्यदिनाच्या या आठवड्यात प्रत्येकांच्या ओठांवर शेरशाहचा उल्लेख असल्याचा दिसून येत आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातून प्रेम आणि विशेष कौतुक होत आहे.

Web Title: Shershaah Movie tops IMDB rating, check the rating heere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app