शिल्पासोबत आनंदी नव्हता राज कुंद्रा...? पती-पत्नीच्या भांडणाबाबत शर्लिन चोप्राचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 02:46 PM2021-07-29T14:46:49+5:302021-07-29T14:47:53+5:30

Raj Kundra case : बळजबरीनं किस केल्याचाही केला आरोप, वाचा काय म्हणाली शर्लिन

sherlyn chopra accusation against raj kundra says his relationship with shilpa shetty was complicated | शिल्पासोबत आनंदी नव्हता राज कुंद्रा...? पती-पत्नीच्या भांडणाबाबत शर्लिन चोप्राचा मोठा खुलासा

शिल्पासोबत आनंदी नव्हता राज कुंद्रा...? पती-पत्नीच्या भांडणाबाबत शर्लिन चोप्राचा मोठा खुलासा

Next
ठळक मुद्देसुत्रांच्या माहितीनुसार शर्लिननं राज कुंद्राची मालकी असलेल्या आर्म्सप्राइम मीडियासोबत करार केला होता.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर रोज नवे खुलासे होत आहेत. आता अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने असाच एक धक्कादायक खुलासा केला आहे. शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्यात फार काही ‘ऑल वेल’ नव्हतं. राजनं स्वत: आपल्याला हे सांगितलं होतं, असं शर्लिननं म्हटलं आहे. 
शर्लिननं मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचला आपलं स्टेटमेंट दिलं आहे. ई-टाइम्सच्या वृत्तानुसार शर्लिननं एप्रिल 2021 रोजी लैंगिक शोषणाच्या विरोधात एफआयआरही दाखल केली होती.शर्लिन चोप्रानं तिच्या तक्रारीत 27 मार्च 2019 रोजी घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. 

या तक्रारीत म्हटल्यानुसार, 2019 च्या सुरुवातीच्या काळात राज कुंद्राने शर्लिनच्या बिझनेस मॅनेजरशी संपर्क साधला होता. 27 मार्च रोजी यानिमित्ताने एक मीटिंगही झाली होती. या मीटिंगनंतर एका टेक्स्ट मेसेज वरून झालेल्या वादावरून राज अचानक शर्लिनच्या घरी आला होता. यावेळी त्याने तिला बळजबरीनं किस करण्याचा प्रयत्न केला होता. शर्लिननं त्याचा जोरदार विरोध केला होता. आपल्याला एका विवाहित पुरूषाशी कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत, असं शर्लिननं त्याला ठणकावून सांगितलं होतं. यावर माझे व शिल्पाचे संबंध फार काही चांगले नाहीत. मी घरी असतो तेव्हा त्रासलेला असतो, असं राज म्हणाला होता.
  शर्लिननं सांगितल्यानुसार, राज थांबवूनही तो थांबत नव्हता. यामुळे ती प्रचंड घाबरली होती आणि राजला धक्का देत बाथरूममध्ये लपली होती.


 
शर्लिननं राज कुंद्रासोबत केला होता करार
सुत्रांच्या माहितीनुसार शर्लिननं राज कुंद्राची मालकी असलेल्या आर्म्सप्राइम मीडियासोबत करार केला होता. भारताबाहेरील कंपन्यांच्या काही अ‍ॅप्ससाठी अश्लील कंटेंट उपलब्ध करुन देण्यासाठीचा करार करण्यात आला होता. शर्लिन  सेमी पोर्नोग्राफिकच्या आधारावर एक अ‍ॅप चालवत होती. हे पार्टटाइम काम चांगलं चालत नसल्यामुळे तिनं राजशी संपर्क केला होता. राज कुंद्रासोबत करार करुन 50 टक्के नफ्याच्या वाट्यावर दोघांमध्ये करार झाला होता. राज कुंद्रानं स्वत: या करारावर स्वाक्षरी केली होती. 
जून 2019 आणि जुलै 2020 दरम्यान दोघांनी खूप चांगली कमाई केली. पण करारानुसार पैसे आपल्याला मिळत नसल्याचं शर्लिनच्या लक्षात आलं आणि तिनं एका वषार्नंतर करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी 2021 नंतर शर्लिननं दिलेल्या जबाबात तिनं राज कुंद्राानं आपल्याला पूर्णपणे पॉर्न इंडस्ट्रीमध्ये ढकलल्याचा आरोप केला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sherlyn chopra accusation against raj kundra says his relationship with shilpa shetty was complicated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app