sheopur man considers actress sridevi as his wife has not married at age of 57 | श्रीदेवींना मनोमन ‘पत्नी’ मानणारा जबरा फॅन, आजपर्यंत केले नाही लग्न

श्रीदेवींना मनोमन ‘पत्नी’ मानणारा जबरा फॅन, आजपर्यंत केले नाही लग्न

ठळक मुद्देदुबईच्या एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. त्या दुबईमध्ये मोहित मारवाहच्या लग्नासाठी गेल्या होत्या.

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाला काल तीन वर्षे पूर्ण झालीत. मात्र अद्यापही देशभरातील श्रीदेवींचे चाहते या दु:खातून सावरलेले नाहीत. काल श्रीदेवींना देशभरातील चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली. श्रीदेवींचा एक जबरा फॅन मध्यप्रदेशातील ददुनी या छोट्याशा गावचा आहे. या फॅनने श्रीदेवींच्या स्मृतीप्रीत्यर्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. त्याचे नाव ओमप्रकाश.
या फॅनचे वय 57 वर्षे. मात्र अद्यापही तो अविवाहित आहे. कारण काय तर, त्याने श्रीदेवींना मनोमन पत्नी मानले होते. श्रीदेवींना आयुष्यात एकदा तरी भेटावे, अशी त्याची इच्छा भलेही अधुरी राहिली. पण पुढच्या जन्मात मी श्रीदेवींना नक्की भेटेन, ही या चाहत्याची आस कायम आहे.

श्रीदेवींच्या निधनानंतर या चाहत्याने पतीप्रमाणे अभिनेत्रीचे सर्व अंतिमविधी केले होते. 1986 साली ओमप्रकाशने श्रीदेवींना मनोमन पत्नी मानले होते. यानंतर त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. घरातल्यांनी ओमप्रकाशच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला. पण ओमप्रकाशच्या मनात श्रीदेवी होती. त्याने तिलाच पत्नीचा दर्जा दिला होता.

24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवींच्या निधनाचे वृत्त ऐकून ओमप्रकाशची अवस्था कोणाला बघवत नव्हती. पाच दिवस त्याने अन्नाचा कणही घेतला नव्हता. श्रीदेवींचा अंत्यसंस्कार झाल्यावर, त्याने मुंडन करून सर्व विधी पूर्ण केले होते.

दुबईच्या एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. त्या दुबईमध्ये मोहित मारवाहच्या लग्नासाठी गेल्या होत्या.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sheopur man considers actress sridevi as his wife has not married at age of 57

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.