हिंदी चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी आणि प्रतिभावंत कलाकार म्हणजे अभिनेता शेखर सुमन. प्रमुख हिरोची भूमिका असो किंवा विनोदी शेखर सुमन यांनी आपल्या अभिनयाने वेगळीच छाप पाडली आहे. छोटा पडदाही त्यांनी तितकाच गाजवला. कॉमेडी असो किंवा रियालिटी शोचा जज, प्रत्येक भूमिका त्यांनी तितक्याच मेहनतीने निभावली. शेअर सुमन यांच्याकडे चित्रपटसृष्टी आणि कोस्टारबाबतचा आठवणींचा खजिना आहे. अशीच एक धकधक गर्ल माधुरी दीक्षितबाबतची आठवण त्यांनी शेअर केली आहे. निर्माते सुदर्शन रतन यांनी त्याकाळी शेख सुमन यांना त्यांच्या एका चित्रपटासाठी शेखर सुमन यांच्याकडे विचारणा केली.

त्यावेळी सुमन यांनी मानधनाबाबत विचारणा केली. मात्र “चित्रपटाची नायिका नवखी असून तिने राजश्री बॅनरच्या अबोध चित्रपटात काम केलंय. त्यामुळे  मानधन देणं शक्य होणार नाही” असं रतन यांनी सांगितलं. तरीही रतन यांच्या आग्रहाखातर शेखर सुमन त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्यावेळी माधुरीची ते वाट पाहत होते. तेवढ्यात माधुरी समोर येताच रतन यांनी शेखर सुमन यांना पुन्हा एकदम चित्रपटात काम करण्याबाबत विचारलं. त्यावेळी क्षणाचाही वेळ न घालवता शेखर सुमन यांनी कोणतंही मानधन न घेता चित्रपटात काम करण्यास होकार दिला. यानंतर सुभाष घई यांच्या सेटवर खास माधुरीला पाहण्यासाठी जायचो अशी कबुलीही त्यांनी दिली.

शिवाय कधीकाळी माधुरीला तिच्या घरून पिकअप, ड्रॉप करायचो अशी आठवणही त्यांनी सांगितली. एकदा तर शेखर सुमन यांच्या पत्नीने त्यांच्या घरी माधुरीला स्वतःचे कपडेही दिले. तसंच मेकअप खराब झाल्यामुळे त्यावेळी शेखर सुमन यांच्या पत्नीनेच मेकअप केल्याचंही ते आवर्जून सांगतात. 

Web Title: Shekhar Suman ready to work in film without fees after seen this marathi actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.