shekhar ravjiani pays rs 1672 for 3 egg whites in a five star hotel | पंचतारांकित हॉटेलात तीन अंड्यांसाठी शेखरने मोजले इतके रूपये, बिल पाहून बसेल धक्का

पंचतारांकित हॉटेलात तीन अंड्यांसाठी शेखरने मोजले इतके रूपये, बिल पाहून बसेल धक्का

ठळक मुद्देयापूर्वी राहुल बोसलाही असाच अनुभव आला होता. राहुलनेही बिलाचा फोटो शेअर केला होता.

बॉलिवूड अभिनेता राहुल बोस याने चंदीगडमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलात दोन केळी ऑर्डर  केली होती आणि हॉटेलने चक्क 442 रूपयांचे बिल फाडले होते. राहुलने सोशल मीडियावर हे बिल शेअर केल्यानंतर वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले होते. आता अगदी असाच किस्सा म्युझिक कंपोझर शेखर रावजियानीसोबत घडला. बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत देणारी विशाल-शेखर यांची जोडी साऱ्यांनाच ठावूक आहे. सध्या शेखर रावजियानीची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. होय, गुरुवारी एका फाईव्ह स्टार हॉटेलात मुक्कामाला असताना समोर आलेले बिल पाहून त्याला धक्काच बसला. होय, शेखर एका पंचतारांकित हॉटेलात मुक्कामाला होता. यादरम्यान त्याने तीन उकडलेली अंडी ( पांढरा भाग) मागवली आणि यासाठी त्याला तब्बल 1672 रूपयांचे बिल आकारण्यात आले. 
शेखर रविजानीने या बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  अंड्यासाठी १६७२? हे जरा जास्त महागडे खाणे आहे,नाही? असे त्याने हा फोटो शेअर करताना लिहिले.


यापूर्वी राहुल बोसलाही असाच अनुभव आला होता. राहुलनेही बिलाचा फोटो शेअर केला होता. यात दोन केळींसाठी त्याला 442 रूपयांचे बिल आकारण्यात आले होते. हे प्रकरण इतके वाढले होते की, संबंधित हॉटेलला 25 हजारांचा दंड आकारण्यात आला होता. पण यानंतर फेडरेशन ऑफ हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष जीएस कोहलीने या अव्वाच्या सव्वा बिलाचे समर्थन केले होते. हॉटेलमध्ये कुठलीही गोष्ट स्वस्त मिळत नाही. हॉटेल केवळ पदार्थ खरेदी करून ग्राहकाला देत नाही तर सोबत सेवा, गुणवत्ता, कटलरी आदी गोष्टीही पुरवतो. त्यासाठी इतका पैसा मोजावा लागत असेल तर त्यात काहीही गैर नाही, असे ते म्हणाले होते.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shekhar ravjiani pays rs 1672 for 3 egg whites in a five star hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.