She Move It Like : acteress warina hussain team up with badshah for pop song | She Move It Like : वरीना हुसैनला ‘बादशाह’चा आधार! पाहा, व्हिडिओ!

She Move It Like : वरीना हुसैनला ‘बादशाह’चा आधार! पाहा, व्हिडिओ!

ठळक मुद्देबादशाहसोबत काम करण्याचा आनंद वरीनाने बोलून दाखवला. बादशाहसोबत काम करण्याचा अनुभव शानदार राहिला. या गाण्यात मी तीन वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसणार आहे. माझा हा पहिला पॉप व्हिडिओ आहे. पॉप सॉन्ग करणार ते फक्त बादशाहसोबत हे मी आधीच ठरवले होते. मला ती संधी मिळाली

वरीना हुसैन हिने याचवर्षी ‘लवयात्री’ या चित्रपटातून ग्रॅण्ड डेब्यू केला. या चित्रपटात वरीना सलमान खानचा जावई आशुष शर्मा याच्यासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसली. दुर्दैवाने वरीना चा डेब्यू फार यशस्वी झाला, असे म्हणता येणार नाही. याचे कारण म्हणजे, ‘लवयात्री’ जितक्या ग्रॅण्ड रूपात रिलीज झाला, तितकाच दणकून आपटला. पहिल्या डेब्यू चित्रपटाची बॉक्सआॅफिसवर अशी गत झालेली पाहुन कोण हिरमुसणार नाही. पण एका अपयशाने खचता कामा नये. वरीना नेही हेच केले. होय, पहिल्या डेब्यू चित्रपटाचे अपयश विसरून वरीना नव्या कामाला लागली. रॅपर बादशाहच्या ‘शी मूव इट लाईक’ गाण्यात वरिना दिसतेय. आज वरीना व बादशाहचे हे गाणे रिलीज झाले.


बादशाहसोबत काम करण्याचा आनंद वरीनाने बोलून दाखवला. बादशाहसोबत काम करण्याचा अनुभव शानदार राहिला. या गाण्यात मी तीन वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसणार आहे. माझा हा पहिला पॉप व्हिडिओ आहे. पॉप सॉन्ग करणार ते फक्त बादशाहसोबत हे मी आधीच ठरवले होते. मला ती संधी मिळाली, असे वरीना म्हणाली.
कॅडबरी सिल्क चॉकलेटच्या जाहिरातीत वरीना चमकली होती. ही जाहिरात पाहूनच सलमानने तिला आयुष शर्मांसोबत चित्रपटात काम करण्याची आॅफर दिली होती. न्यू-यॉर्क फिल्म अकॅडमीमधून वरीनाने आपलं शिक्षण पूर्ण केले आहे. ती आता 23 वर्षांची असून तिची आई अफगाणी आणि वडील इराणी आहे. लहान वयातच तिने मॉडेलिंग सुरू केले. 2013मध्ये तिने दिल्लीतून मॉडेलिंग करिअला सुरुवात केली. सुप्रसिद्ध ब्रॅन्ड्ससोबत वरीनाने कित्येक जाहिरातीही केल्या आहेत.

Web Title: She Move It Like : acteress warina hussain team up with badshah for pop song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.