ठळक मुद्दे मन्सूर यांची आई भेटायला येत असल्याचा निरोप शर्मिला यांना आला आणि शर्मिला अडचणीत आल्या.

कश्मीर की कली, वक्त, आमने सामने असे शानदार सिनेमे देणा-या अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा आज वाढदिवस. एकेकाळी बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणा-या शर्मिला यांनी सत्यजीत रे यांच्या ‘अपुर संसार’ या चित्रपटातून अ‍ॅक्टिंगला सुरुवात केली. 1964 साली त्यांचा पहिला बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे नाव होते, ‘कश्मीर की कली’. या चित्रपटाने शर्मिला यांना एक वेगळी ओळख दिली. पण यानंतर ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ या चित्रपटात शर्मिला यांनी एक बिकिनी सीन दिला आणि त्यांच्या या सीनने खळबळ माजली. देशाच्या संसदेतही हा मुद्दा गाजला होता.

याच बिकिनी सीनशी संबंधित एक किस्सा क्वचित लोकांना ठाऊक असेल. होय, ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस’च्या रिलीजवेळी  शर्मिला आणि क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांचे अफेअर जोरात होते. हे अफेअर घरच्यांच्याही कानावर गेले होते. एकदिवस अचानक मन्सूर यांची आई भेटायला येत असल्याचा निरोप शर्मिला यांना आला आणि शर्मिला अडचणीत आल्या.

कारण काय तर अख्ख्या मुंबईत त्यांच्या ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ या चित्रपटातील बोल्ड बिकिनी सीनचे पोस्टर्स व मोठ मोठे होर्डिंग्स लागले होते. होणा-या सासूने आपल्याला बिकिनीमध्ये पाहिले तर काय होईल, या भीतीने शर्मिला यांची चिंता वाढली होते. मन्सूर यांची त्या पोस्टर्सवर काहीच हरकत नव्हती कारण तो शर्मिला यांच्या कामाचाच एक भाग होता. पण होणा-या सासूची प्रतिक्रिया काय असेल या चिंतेने शर्मिला यांना ग्रासले होते. मग काय, शर्मिला यांनी एक नामी युक्ती शोधून काढली.

त्यांनी  निर्मात्यांना फोन करुन रात्रीतून मुंबईत ज्या ज्या ठिकाणी बिकिनीधील पोस्टर लावण्यात आले होते ते काढून टाकण्यास सांगितले आणि एका रात्रीत शर्मिलांच्या मुंबईतील रस्त्यांवरचे बिकनी पोस्टर्स हटवले गेले. तेव्हा कुठे शर्मिलांचा जीव भांड्यात पडला. निश्चिंत होत त्यांनी  मन्सूर यांच्या आईची भेट घेतली. त्यानंतर शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांचे लग्न झाले.

Web Title: sharmila tagore birthday special her bikini photoshoot makes news that time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.