Sharad Kelkar will be seen in the sequel of 'This' movie | शरद केळकर झळकणार 'या' सिनेमाच्या सिक्वलमध्ये
शरद केळकर झळकणार 'या' सिनेमाच्या सिक्वलमध्ये

ठळक मुद्देशरद केळकर यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेहा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे.

अक्षय कुमार आणि रितेश देशमुखच्या हाऊसफुल 4 चे शूटिंग सुरु झाले आहे. या सिनेमात रितेश व्यतिरिक्त आणखीन एक मराठमोळा चेहरा दिसणार आहे. शरद केळकर यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शरद याआधी गलियोंकी रासलीला -राम-लीला आणि भूमी या सिनेमांमध्ये दिसला होता. 


शरद म्हणाला, ''मी नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतो. मला त्याच त्याच भूमिका परत करायला आवडत नाहीत. मला प्रखर भूमिका साकारायला आवडतात.''      
रितेश देशमुखसोबत काम करण्याची शरदची ही दुसरीवेळ आहे. याआधी त्यांने रितेशसोबत 'लयभारी' सिनेमात काम केले होते. 


या कलाकरांसोबत यात संजय दत्तचे नाव ही 'हाउसफुल-4' साठी चर्चेत होते. चित्रपटाचे निर्माते सतत यासंदर्भात संजूबाबाशी चर्चा करत होते मात्र काही कारणांमुळे ते होऊ शकले नाही. संजय दत्त यांच्या जागेवर आता यात नाना पाटेकर दिसणार आहेत.


हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. चित्रपटाचे बजेट दोनशे कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटासाठी हॉलिवूड येथून वीएफएक्स टीमलाही बोलावण्यात आले आहे. 'हाउसफुल-4' ची कथा पुनर्जन्मावर आधारित असणार आहे. हा चित्रपट पुढच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. हाउसफुल- 3’ 2016 मध्ये रिलीज झाली होता. या चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा अधिक गल्ला जमविला होता. त्यामुळे चौथा भागही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल, असा निर्मात्यांना ठाम विश्वास आहे. आतापर्यंत या सिरीजचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून, सर्वच सुपरहिट ठरले आहेत. आता चौथा चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्याचबरोबर बॉबी या कॉमेडी सिक्वेंसमध्ये कितपत परफेक्ट बसेल हे बघणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. 

 

English summary :
Akshay Kumar and Riteish Deshmukh have started shooting for Housefull 4. Shirad Kelkar will play an important role in this. The story of 'Housefull 4' will be based on Rebirth. This movie is going to be released next Diwali.


Web Title: Sharad Kelkar will be seen in the sequel of 'This' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.