Shana khan glamorous look in black outfits share photos | ब्लॅक आऊटफिटमध्ये ग्लॅमरस दिसतेय सुहाना खान, गळ्यातील पेंडंटने वेधलं साऱ्यांचं लक्ष

ब्लॅक आऊटफिटमध्ये ग्लॅमरस दिसतेय सुहाना खान, गळ्यातील पेंडंटने वेधलं साऱ्यांचं लक्ष

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेलं नसलं तरी फॅन फॉलोव्हिंगच्या बाबतीत ती भल्याभल्यांना टक्कर देते. सुहाना सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.  इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. सुहानाने सोशल मीडियावर आपले फोटो नेहमीच पोस्ट करत असते. चाहत्यांना तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावदेखील करत असतात. अलीकडेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे जोरदार व्हायरल होतायेत. 

या फोटोंमध्ये सुहाना ब्लॅक ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय.  फोटो बघून तिने गळ्यात घातलेल्या पेंडेंटची सर्वाधिक चर्चा होत आहे. तिच्या चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आहे त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून आपली पसंती दर्शवली आहे. 

सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये असून ती तिचे शिक्षण पूर्ण करते आहे. शाहरुखची लेक सुहान पॉप्युलर स्टार किड्स पैकी एक आहे. सोशल मीडियावर तिला प्रचंड फॅनफॉलोईंग आहे. सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे.2018 मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती. कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती. शाहरूखला काहीतरी भव्य हवे होते.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shana khan glamorous look in black outfits share photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.