ठळक मुद्देशक्तीची पत्नी दिसायला अतिशय सुंदर असून ती खूपच कमी वेळा सार्वजिनिक ठिकाणी शक्ती किंवा श्रद्धासोबत हजेरी लावते. पण शक्ती कपूरच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर आपल्याला त्याच्या पत्नीचे अनेक फोटो पाहायला मिळतात. 

शक्ती कपूरने एक खलनायक, विनोदी कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये एक खास जागा निर्माण केली आहे. त्याने बॉलिवूडचा एक काळ गाजवला होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. शक्तीच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची मुलगी श्रद्धा कपूरने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. श्रद्धा कपूरने खूपच कमी वेळात एक अभिनेत्री, गायिका, गीतकार आणि डिझायनर म्हणून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'आशिकी 2', 'एक व्हिलन', 'एबीसीडी 2', 'बागी', 'रॉक ऑन 2' 'स्त्री' अशा तिच्या विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत. आजच्या पिढीची नायिका म्हणून श्रद्धाने तरुणाईच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. श्रद्धाचा साहो आणि छिछोरे हे दोन चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले असून या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शक्ती कपूर गेली अनेक वर्षं चित्रपटसृष्टीचा भाग आहे. तुम्हाला माहीत आहे का, शक्ती कपूरने प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेच्या बहिणीसोबत लग्न केले असून त्याच्या पत्नीचे नाव शिवांगी कपूर आहे. शक्तीची पत्नी दिसायला अतिशय सुंदर असून ती खूपच कमी वेळा सार्वजिनिक ठिकाणी शक्ती किंवा श्रद्धासोबत हजेरी लावते. पण शक्ती कपूरच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर आपल्याला त्याच्या पत्नीचे अनेक फोटो पाहायला मिळतात. 

शिवांगी या अगदी त्यांची बहीण पद्मिनी कोल्हापूरे यांच्यासारख्याच दिसतात. शिवांगी यांना पद्मिनी आणि तेजस्विनी अशा त्यांना दोन बहिणी आहेत. तेजस्विनीदेखील अभिनेत्री असून तिने काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

शिवांगी यांनी किस्मत या चित्रपटात शक्ती कपूर यांच्यासोबत काम केले आहे. खरे तर हा चित्रपट आधी पद्मिनी कोल्हापूरेला ऑफर करण्यात आला होता. पण काही कारणास्तव पद्मिनीला या चित्रपटात काम करणे शक्य झाले नाही आणि या चित्रपटात शिवांगी यांची वर्णी लागली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. पण याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शिवांगी आणि शक्ती कपूर यांच्यात अफेअर सुरू झाले आणि त्यांनी 1982 मध्ये कोर्टात लग्न केले. शिवांगी या लग्नाच्यावेळेस केवळ 18 वर्षांच्या असल्याने या लग्नाला त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता. पण काही काळाने हा विरोध मावळला. 

Web Title: shakti kapoor's wife shivangi kapoor is as much beautiful as shraddha kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.