ठळक मुद्देशक्ती  कपूर यांची फिरोज खान यांच्यासोबत भेट झाली आणि त्यांना ‘कुर्बानी’ सिनेमा मिळाला. या चित्रपटानंतर शक्ती कपूर स्टार झालेत.  

एखाद्याच्या आयुष्याला कधी, केव्हा, कुठे आणि कशी कलाटणी मिळेल, हे सांगता येत नाही. आता या अभिनेत्याचेच बघा ना. हा अभिनेता एकेकाळी सुनील दत्त यांच्या दरमहा 1500 रूपयांवर स्वत:चा खर्च भागवायचा. आज तोच अभिनेता बॉलिवूडचा दिग्गज हिरो म्हणून ओळखला जातो. आम्ही बोलतोय ते बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांच्याबद्दल.
शक्ती कपूर यांनी 1972 साली ‘जानवर और इन्सान’ या सिनेमाद्वारे अभिनयास सुरुवात केली होती. मात्र त्यांना खरी ओळख दिली ती ‘कुर्बानी’ या सिनेमाने. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. शक्ती कपूर मोठ्या पडद्यावर उत्तम अभिनय करतात पण त्यांनी अभिनेता बनण्याची कहाणी चांगलीच इंटरेस्टिंग आहे.

शक्ती कपूर फिल्म इंडस्ट्रीत आले तेव्हा त्यांचे नाव सुनील होते. सुनील दत्त आणि नरगिस दत्त यांनीच त्यांचे शक्ती असे नामकरण केले. चित्रपटसृष्टीत आल्यानंतर नवखे असल्याने त्यांना काम मिळत नव्हते. पैशांची चणचण होतीच. अशा कठीण काळात अभिनेते सुनील दत्त यांनी शक्ती कपूर यांना आधार दिला होता. सुनील दत्त त्यांना त्याकाळी 1500 रूपये महिना देत. यामुळे शक्ती यांचा महिनाभराचा खर्च भागायला. अभिनेते विनोद खन्ना यांच्या घरी शक्ती कपूर जवळपास 5 वर्षे राहिले होते.
पुढे शक्ती  कपूर यांची फिरोज खान यांच्यासोबत भेट झाली आणि त्यांना ‘कुर्बानी’ सिनेमा मिळाला. या चित्रपटानंतर शक्ती कपूर स्टार झालेत.  

अपघाताने मिळाला ‘कुर्बानी’
शक्ती कपूर यांना ‘कुर्बानी’ हा सिनेमा कसा मिळाला याचा किस्सा त्यांनी स्वत: कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितला होता. त्यांनी सांगितले होते की, काही वर्षांपूर्वी लिंकिंग रोडहून दक्षिण मुंबईच्या रस्त्यावर जात असताना माझ्या गाडीची एका मर्सिडिजशी टक्कर झाली. जेव्हा मी गाडीतून उतरलो तेव्हा एक उंच देखणा माणूस मर्सिडिजमधून बाहेर पडताना दिसला ते दुसरे कोणी नव्हे तर फिरोज खान होते. त्यांना गाडीतून बाहेर येताना बघून मी लगेचच म्हणालो, ‘सर, माझे नाव शक्ती कपूर, मी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा घेतला आहे. कृपया मला तुमच्या चित्रपटात भूमिका द्या. फिरोज खान यांनी हे ऐकले आणि ते गाडीत बसून निघून गेले.

यानंतर एका  सायंकाळी, मी के. के. शुक्ल या माझ्या जिवलग मित्राच्या घरी गेलो. तो लेखक होता आणि तो फिरोज खान यांच्यासोबत ‘कुर्बानी’ चित्रपटावर काम करत होता. मी गेलो तेव्हा त्याने मला सांगितले की,  फिरोज खान चित्रपटातील एका विशिष्ट भूमिकेसाठी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधील एका माणसाच्या शोधात आहेत, जो त्यांच्या गाडीला आज धडकला होता.  हे ऐकून मी खूप खूश झालो आणि म्हणालो,  मीच तो माणूस.  शुक्लने लगेचच फिरोज खान यांना फोन केला आणि त्यांना शक्ती कपूरबद्दल सांगितले आणि अशा प्रकारे मला   ‘कुर्बानी’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shakti kapoor did job at sunil dutt house thereafter he bacame famous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.