बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे फॅन्स त्याच्या सिनेमाची वाट मोठ्या पडद्यावर मोठ्या आतुरतेने बघता येत. किंग खानच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खुशखबर आहे. लवकरच शाहरुखला त्याच्या फॅन्सना सिल्वर स्क्रिनवर पाहता येणार आहे. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार शाहरुख राजकुमार हिरानीच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. 


'झिरो' फ्लॉप गेल्यानंतर शाहरुख खान सिनेमात काहीसा दूर झाला.'झिरो'नंतर शाहरुखने त्याच्या एकाही सिनेमाची घोषणा केली नाही. लवकरच या सिनेमाची शूटिंग शाहरुख सुरु करणार आहे. रेड चिलीज या सिनेमाची निर्मिती करणार आहे. राजकुमार हिरानी पहिल्यांदा विधू विनोद चोप्रा यांच्या बॅनर बाहेर जाऊन सिनेमा करणार आहे.  


रिपोर्टनुसार ऑगस्ट 2020 मध्ये या सिनेमाची शूटिंग सुरु करणार आहे. या शूटिंग कॅनडा, लंडन आणि गुजरातमध्ये शूटिंग होणार आहे. सिनेमात करीना कपूर आणि काजोलची एंट्री होऊ शकते. काजोल आणि शाहरुखच्या जोडीने आतापर्यंत अनेक हिट सिनेमा दिले आहेत.  


तसेच शाहरुख खान शेरशाहमध्ये कॅमिओ करणार आहे. शेरशाह चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असून कारगील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे. यात कारगील वॉरमधील हिरो विक्रम बत्रा यांची कथा सांगण्यात येणार आहे. या बॉयोपिकमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा डबल रोल करतो आहे.

Web Title: Shahrukh khan will be seen in rajkumar hiranis film in 2020 gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.