ठळक मुद्देअलीकडे आलिया व रणबीर कपूर मालदीवला व्हॅकेशनसाठी रवाना झाले होते. त्यांनाही लोकांना असेच ट्रोल केले होते.

शाहरूख खानची (Shah rukh Khan) पत्नी गौरी खान (Gauri Khan) व मुलगा आर्यन खान (Aryan Khan) यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. शिवाय या व्हिडीओवरून गौरी व आर्यनला लोक प्रचंड ट्रोल करताहेत. मुंबईत कोरोनामुळे हाहाकार माजला असताना फिल्मी सेलिब्रिटी वेगवेगळ्या देशात रवाना होत आहेत. याचदरम्यान गौरी व आर्यनही न्यूयॉर्कला रवाना झालेत. तत्पूर्वी मुंबई एअरपोर्टवर त्यांना स्पॉट केले गेले. गौरी व आर्यन  मुंबई सोडून न्यूयॉर्क जात असल्याचे पाहून युजर्स भडकले. त्यांनी दोघांच्या व्हिडीओवर कमेंट्स करत आपला संताप व्यक्त केला. (Shahrukh Khan wife Gauri Khan and son Aryan Khan were leaving for new york)

हे सेलिब्रिटी केवळ नावाचे भारतीय आहेत. देशावर कोणतेही संकट आलेत की, लगेच पळ काढतात, असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरनेही अशीच कमेंट केली. भारतात स्थिती बिघडली की, लगेच विदेशात पळून जा. पैसा इथे कमवा आणि इथल्या लोकांना गरज असेल तेव्हा पळ काढा, अशी कमेंट या युजरने केली. 

निकालो इनको इंडिया से, अशी प्रतिक्रियाही एका युजरने दिली. भागो सबके सब, पब्लिक सब याद रखेगी, एक न एक दिन तो आओगे वापस, असे एकाने लिहिले. लॉकडाऊनच्या काळात या सेलिब्रिटींना घराबाहेर कसे पडता येते? आम्ही घरात बसायचे, सर्व प्रोटोकॉल पाळायचे आणि यांनी बाहेर देशात फिरायचे, असे का? असा सवाल अनेक युजर्सनी केला.

कोरोना महामारीच्या काळात अनेक सेलिब्रिटींनी भारताबाहेर आहेत. काही सुट्टीच्या नावाखाली मालदीवमध्ये आहेत. तर काही अन्य देशांत. अलीकडे आलिया व रणबीर कपूर मालदीवला व्हॅकेशनसाठी रवाना झाले होते. त्यांनाही लोकांना असेच ट्रोल केले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shahrukh khan wife gauri khan and son aryan khan were leaving for new york and the two got brutally trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.