ठळक मुद्देखुद्द कर्नल राज कपूर यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.

शाहरूख खान आजघडीला बॉलिवूडचा ‘किंगखान’ म्हणून ओळखला जातो. पण यासाठी त्याने बरेच स्ट्रगल केले. छोट्या पडद्यापासून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. खूप स्ट्रगल केल्यानंतर त्याला मोठ्या पडद्यावर एन्ट्री मिळाली.  याच शाहरुखच्या करिअरच्या सुरुवातीचा एक किस्सा चांगलाच मजेशीर आहे. होय, विश्वास बसणार नाही पण एकेकाळी एक दिग्दर्शक शाहरूखच्या मागे दगड घेऊनही धावला होता. 

तर हा किस्सा आहे, ‘फौजी’ या मालिकेच्या सेटवरचा. या मालिकेपासून शाहरुखने आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि याच मालिकेच्या सेटवर तो एक मोठा धडा शिकला होता. तर ‘फौजी’चे शूटींग सुरु होते. पण शाहरूख रोज सेटवर उशीरा यायचा.

‘फौजी’चे दिग्दर्शक कर्नल राज कपूर यांनी काही दिवस याकडे दुर्लक्ष केले. एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस त्यांनी याकडे कानाडोळा केला. पण शाहरूख बधेना. अखेर शाहरूखला धडा शिकवायचाच असे त्यांनी ठरवले. दुस-या दिवशी शाहरूख पुन्हा सेटवर उशीरा आला आणि कर्नल राज कपूर त्याला बघताच त्याच्यामागे दगड घेऊन धावले.

खुद्द कर्नल राज कपूर यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. शाहरूखला वेळेचे महत्त्व शिकवण्यासाठी मी त्याच्यामागे दगड घेऊन धावलो होतो. त्यानंतर चांगलाच सुधारला होता, असे त्यांनी सांगितले होते. कॅमेरा शाहरूखवर प्रेम करायचा, अशा शब्दांत त्यांनी शाहरूखचे कौतुकही केले होते.
 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shahrukh khan was late for shooting tv show fauji director colonel raj kapoor convinced him to be punctual

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.