ठळक मुद्देभविष्यात मला एखाद्या ॲक्शन चित्रपटामध्ये काम करायचे आहे. खलनायकासोबत दोन हात करणारा पण त्याचसोबत त्याच्या संवादांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या नायकाची भूमिका मला साकारायची आहे.

झिरो या चित्रपटानंतर आता शाहरुख खानचा आगामी चित्रपट कधी येणार याची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत. शाहरुखचा झिरो काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा त्याचा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर त्याने चित्रपटातून काही महिन्यांचा ब्रेक घेतला आहे. शाहरुख सध्या जास्तीत जास्त वेळ त्याच्या कुटुंबियांना देत आहे. शाहरुखने झिरोनंतर अद्याप कोणताच चित्रपट साईन केला नाही असे त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.


शाहरुखला आता एका वेगळ्या जॉनरच्या चित्रपटात काम करायचे आहे आणि त्यानेच ही गोष्ट त्याच्या मुलाखतीत सांगितली आहे. शाहरुख सांगतो, मी गेल्या काही महिन्यात अनेक स्क्रिप्ट वाचल्या आहेत. पण त्यामधील कोणतीच स्क्रिप्ट माझ्यासाठी योग्य आहे असे मला वाटले नाही आणि त्यामुळे मी अद्याप तरी एकही चित्रपट साईन केलेला नाही. पण भविष्यात मला एखाद्या ॲक्शन चित्रपटामध्ये काम करायचे आहे. खलनायकासोबत दोन हात करणारा पण त्याचसोबत त्याच्या संवादांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या नायकाची भूमिका मला साकारायची आहे. पण माझ्यासाठी अशाप्रकारची कथा कोणी लिहितच नाहीये याचे मला दुःख वाटत आहे. 

शाहरुख खानने आजवर अनेक रोमँटिक, कॉमेडी चित्रपटात काम केले आहे. पण शाहरुखला ॲक्शन करताना आपल्याला खूपच कमी चित्रपटात पाहायला मिळाले आहे. सलमान खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांना ॲक्शन हिरो म्हणून ओळखले जाते. त्यांच्या चित्रपटाच ॲक्शनसोबतच कॉमेडीचा देखील तडका असतो. सलमान खानचे याच साच्यातील दबंग, वाँटेड प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते तर अजयचा याच जॉनरचा सिंघम प्रचंड गाजला होता. शाहरुखच्या या विधानानंतर आता शाहरुखला देखील सलमान, अजय आणि अक्षय यांच्या पावलावर पाऊल ठेवत अशा एखाद्या चित्रपटात काम करायचे आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल. आता शाहरुख एखाद्या ॲक्शन चित्रपटात कधी झळकतोय हे आपल्याला लवकरच कळेल. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shahrukh Khan wants to do Action Movie like salman khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.