Shahrukh khan talks about his flop films in ask srk session on twitter | Ask SRK: सगळेच सिनेमे होताहेत फ्लॉप; शाहरुखने मारला अजय देवगणचा डायलॉग!
Ask SRK: सगळेच सिनेमे होताहेत फ्लॉप; शाहरुखने मारला अजय देवगणचा डायलॉग!

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आज ट्विटरवर ट्रेंड होतो आहे. त्यांने  #AskSRK नावाचे सेशनला ट्विटरवर सुरु केले आहे. किंग खानने फॅन्सला प्रश्न विचारायला सांगितले आणि त्याच्या फॅन्सनी ही याला प्रतिसाद देत प्रश्नांचा भडिमार सुरु केला. अनेक गमतीशीर आणि इंटरेस्टिंग प्रश्न शाहरुखला त्याच्या फॅन्सनी विचारले आहेत. शाहरुखने आपल्या ट्विटरवर लिहिले की चला  #AskSRK पण फक्त 20 प्रश्न.  

एका व्यक्तीने शाहरुखला ट्रोल करताना विचारले की, सध्या तुझे सगळे सिनेमा फ्लॉप जातायेत. तुला कसं वाटतंय, उत्तर नक्की दे. यावर शाहरुखने खूप मजेदार उत्तर दिले आहे. तो म्हणाला, '' बस आप दुआ में याद रखना.''
कित्येक शाहरूखचे चाहते आहेत जे शाहरूखच्या आगामी सिनेमाची वाट पाहत आहेत. एका चाहत्याने म्हटले की,तुमच्या नव्या प्रोजेक्टला घेऊन अनेक अफवा येत आहेत. प्लीज तुम्हीच तुमच्या आगामी चित्रपटाची घोषणा करा. त्यावर शाहरूखने सांगितले की, मीच अनाउंस करणार आणखीन कोण करणार भावा.
शाहरूखला अभिनेता रितेश देशमुखने विचारलं की तू तुझा मुलगा अबरामला जीवनातील कोणता धडा शिकविला आहेस? त्यावर शाहरूख म्हणाला की, जेव्हा पण तुम्ही भुकेले असाल किंवा रागात, त्यावेळी तुम्हाला तुमचा आवडता गेम खेळत थोडे रडले पाहिजे. 
शाहरूखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शाहरूखने झिरो चित्रपटानंतर कोणत्याही नव्या सिनेमाची घोषणा केली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले होते. या चित्रपटात शाहरूखसोबत अनुष्का शर्मा व कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होती. हा सिनेमा २०१८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर शाहरूखच्या नव्या प्रोजेक्टबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. यादरम्यान त्याचे नाव दिग्दर्शक राजकुमार हिराणीपासून दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीसोबत जोडले गेले होते.

Web Title: Shahrukh khan talks about his flop films in ask srk session on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.