shahrukh khan rescues aishwarya rai bachchans manager from fire at amitabh bachchans diwali bash | बच्चन फॅमिलीच्या दिवाळी पार्टीत शाहरूखमुळे टळली एक मोठी दुर्घटना, थोडक्यात बचावली ऐश्वर्याची मॅनेजर
बच्चन फॅमिलीच्या दिवाळी पार्टीत शाहरूखमुळे टळली एक मोठी दुर्घटना, थोडक्यात बचावली ऐश्वर्याची मॅनेजर

ठळक मुद्देही घटना पहाटे 3 वाजता घडली. यावेळी काही मोजके लोक पार्टीत हजर होते.

यंदाची बच्चन फॅमिलीने होस्ट केलेली दिवाळी पार्टी अनेकार्थाने चर्चेत राहिली. गत दोन वर्षांनंतर बच्चन कुटुंबाने पहिल्यांदा दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. त्यामुळे बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी या ग्रॅण्ड पार्टीला हजेरी लावली. पण याच पार्टीत एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. विशेष म्हणजे, किंगखान शाहरूख खानने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ही घटना टळली.
बच्चन फॅमिलीच्या या पार्टीत शाहरूख व त्याची पत्नी गौरी खान सहभागी झाली होती. पार्टी रंगात आली असताना अचानक ऐश्वर्या राय बच्चनची मॅनेजर अर्चना सदानंद हिच्या लहंग्याला दिव्याने आग लागली. क्षणात अर्चनाच्या लहंग्याने पेट घेतला. यामुळे सगळीकडे एकच खळबळ माजली. अशात शाहरूख खानने स्वत:चे जॅकेट काढून त्याच्या मदतीने आग रोखण्याचे प्रयत्न केला. त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाने आग क्षणात आटोक्यात आली. 

या घटनेत अर्चनाला दुखापत झाली. तिला लगेच रूग्णालयात हलवण्यात आले. सध्या अर्चना रूग्णालयात असल्याचे कळतेय. इन्फेक्शन वाढू नये यासाठी डॉक्टरांनी तिला आयसीयूमध्ये ठेवले आहे. शाहरूखलाही यादरम्यान किरकोळ इजा झाल्याचे कळतेय. फराह खानच्या टिष्ट्वटने या घटनेला दुजोरा दिला आहे.

ही घटना पहाटे 3 वाजता घडली. यावेळी काही मोजके लोक पार्टीत हजर होते. ऐश्वर्याची मॅनेजर अर्चना तिच्या मुलीसोबत कोर्टयार्डमध्ये उभी होती. याचदरम्यान अचानक तिच्या लहंग्याला बाजूला असलेल्या पेटत्या दिव्याने आग लागली. लहंग्याला आग लागलेली पाहून सर्वजण घाबरले. पण शाहरूखने अर्चनाला वाचवले.
 

Web Title: shahrukh khan rescues aishwarya rai bachchans manager from fire at amitabh bachchans diwali bash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.