Shahrukh khan has start his upcoming film pathan shooting | शाहरुख खानने सुरु केले २०० कोटी बजेट असलेल्या 'पठाण' सिनेमाचे शूटिंग, २०२१ होणार रिलीज

शाहरुख खानने सुरु केले २०० कोटी बजेट असलेल्या 'पठाण' सिनेमाचे शूटिंग, २०२१ होणार रिलीज

अभिनेता शाहरुख खानने बुधवारपासून आपल्या आगामी सिनेमा ‘पठाण’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे निर्माता यशराज फिल्म्स यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. किंवा शाहरुखकडून कोणतीही अधिकृत बातमी आलेली नाही. पण, हिंदी चित्रपटांच्या या दोन दिग्गजांनी छुप्या पद्धतीने एकत्र काम करण्यास सुरुवात केली आहे.

 सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ या अ‍ॅक्शन ड्रामा सिनेमाच्या शूटिंगला मुंबईतील यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये शाहरुखने सुरूवात केली आहे. सुरुवातीचे शेड्यूल सुमारे दोन महिन्यांचे असणार आहे. या चित्रपटात शाहरुखसह अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि  जॉन अब्राहमदेखील दिसणार आहेत. 'पठाण' चित्रपटामध्ये दीपिका शाहरुखबरोबर जोडी करणार आहे तर जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

शाहरूख खानचं मानधन बाजूला केलं जर 'पठाण' सिनेमाचं बजेट जवळपास २०० कोटी रूपये असेल. असे सांगितले जात आहे की, आदित्य चोप्राला हा अ‍ॅक्शन सिनेमा इंटरनॅशनल लेव्हलचा करायचा आहे. असे मानले जात आहे की २०२१ च्या दिवाळीत हा सिनेमा रिलीज केला जाऊ शकतो. पण कोरोना व्हायरसमुळे या सिनेमाबाबत अजून निश्चित काही सांगण्यात आलेलं नाही.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shahrukh khan has start his upcoming film pathan shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.