बॉलिवूडचा किंगखान अर्थात शाहरुख खान गेल्या अनेक दिवसांपासून सिने इंडस्ट्रीपासून दूर आहे. त्याच्या आगामी सिनेमाच्या वाट चाहते मोठ्या आतुरतेने पाहतायेत. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार शाहरुख लवकरच कॅमिओ करताना दिसणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी स्टारर 'शेरशाह'  सिनेमात शाहरुख दिसणार आहे.    


शेरशाह चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असून कारगील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे. यात कारगील वॉरमधील हिरो विक्रम बत्रा यांची कथा सांगण्यात येणार आहे. या बॉयोपिकमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा डबल रोल करतो आहे. तर कियारा अडवाणी सिद्धार्थच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. शाहरुख खानचा यात छोटीशी भूमिका साकारणार आहे. मात्र ही भूमिता विक्रम बत्रा यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असणार आहे.   


विजयने आपल्या करियरची सुरूवात १९९४ साली मालिका आसमांमधून केली होती. जवळपास चार वर्षे मालिकेत काम केल्यानंतर बिजयने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला.


एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानची भूमिका विक्रम बत्रा यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी आहे. शाहरुख खान शेवटचा झिरो सिनेमात दिसला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले होते. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई दाखवू शकला नव्हता. 

Web Title: Shahrukh khan cameo karan johar film shershaah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.