ठळक मुद्देशाहिद कपूर सध्या ‘जर्सी’ या सिनेमात बिझी आहे.  हा सिनेमा याच नावाच्या तेलगू सिनेमाचा रिमेक आहे.

कोरोनाचा कहर वाढतोय. अशात जो तो आपआपल्यापरिने कोरोनापासून बचाव करण्याचे प्रयत्न करतोय. पण अभिनेता शाहिद कपूरची बातच न्यारी. त्याने कोरोनापासून बचावासाठी असा काही कडेकोट बंदोबस्त केला की, पाहून चाहतेही हैराण झालेत. मग चर्चा तर होणारच. कोरोनापासून बचावासाठी त्याने शोधलेल्या नव्या उपायामुळे शाहिद अचानक चर्चेत आला.

मंगळवारी शाहिद मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला. पण पहिल्या नजरेत त्याला कोणीही ओळखू शकले नाही.  फेस मास्क, डोळ्यांवर चश्मा आणि जाड फेस शिल्डने झाकलेला चेहरा अशा अवतारात त्याला कोणीही ओळखू शकले नाही.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर फोटो शेअर केला तेव्हा कुठे, हा शाहिद हे लोकांच्या ध्यानात आले. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात.   

शाहिदने करोना सुरक्षेच्या उपायांना आता एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवले आहे, असे एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिले. तर काहींनी हे जरा अतिच झाले, अशा आशयाच्या कमेंट केल्यात. ही कोणती फॅशन? अशा शब्दांत काही चाहत्यांनी शाहिदची खिल्ली उडवली. कोरोनाची इतकी भीती आहे तर घराबाहेरच का पडला? असा सवाल एका युजरने त्याला केला. 
शाहिद कपूर सध्या ‘जर्सी’ या सिनेमात बिझी आहे.  हा सिनेमा याच नावाच्या तेलगू सिनेमाचा रिमेक आहे. यात शाहिद कपूर एका क्रिकेटपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shahid kapoors way of protection against corona made headline fans said jada ho gaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.