बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीची धडपड, सध्या घेते अशी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 01:34 PM2019-10-11T13:34:28+5:302019-10-11T13:40:16+5:30

सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला मीराची एक से बढकर एक स्टायलिश फोटो पाहायला मिळतील.

​Shahid Kapoor wife Mira Rajput Working Hard For Bollywood Debut | बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीची धडपड, सध्या घेते अशी मेहनत

बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीची धडपड, सध्या घेते अशी मेहनत

googlenewsNext

झगमगत्या दुनियेत करियर करण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण येतात. त्यापैकी सगळ्यांनाच इथं झटपट यश मिळतं असंही नाही.कारण कोणतंही क्षेत्र असो त्यात स्ट्रगल कुणालाही चुकला नाही. मात्र अशा आव्हानात्मक परिस्थितीतही मेहनतीच्या जोरावर अनेक कलाकार सुपरस्टारपदावर पोहचले आहेत. रसिकांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. 


 झगमगत्या चंदेरी दुनियेत संधी मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. संघर्ष आणि नशीबाची साथ या दोन्ही गोष्टींची साथ लाभली तर मेहनतीचे फळ मिळाले असेच समजा. हेच समीकरण सा-यांनाच लागु पडते. सध्या बॉलिवूडमध्ये आपणही नशीब आजमवावे असे स्वप्न पाहते शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपुत. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला मीराची एक से बढकर एक स्टायलिश फोटो पाहायला मिळतील. लग्नानंतर झालेला बदल मीराच्या या फोटोंमध्ये पाहायला मिळतोय. मध्यंतरी मीरा आणि शाहिद कपूर 'नच बलिये' शोला जज करणार असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. मात्र काही कारणामुळे मीराचे ऑनस्क्रीन झळकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. 


चांगली संधी मिळाली तर मीरा राजपुतही रूपेरी पडद्यावर झळकणार असे तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. विशेष म्हणजे हातात कोणत्याही प्रकारचे काम नसतातना ती शाहिदपेक्षा जास्त चर्चेत असते.  ती सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असते. तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळेही तिच्या फॉलोव्हर्सच्या संख्येतही प्रचंड वाढ होत आहे. वर्कआऊट करतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते.  गेल्या काही महिन्यांपासून मीरा आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येत आहे. 

Web Title: ​Shahid Kapoor wife Mira Rajput Working Hard For Bollywood Debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.