अपने आप को अ‍ॅक्ट्रेस समजती है क्या? मीरा राजपूत झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 03:32 PM2020-01-24T15:32:26+5:302020-01-24T15:33:32+5:30

मीराचे असे काही फोटो समोर आलेत की, ती ट्रोल झाली.

shahid kapoor wife mira rajput steps out for dinner got trolled | अपने आप को अ‍ॅक्ट्रेस समजती है क्या? मीरा राजपूत झाली ट्रोल

अपने आप को अ‍ॅक्ट्रेस समजती है क्या? मीरा राजपूत झाली ट्रोल

googlenewsNext
ठळक मुद्दे2015 मध्ये मीरा व शाहिदचे लग्न झाले होते.

बॉलिवूड स्टार शाहिद कपूरची बेटरहाफ मीरा राजपूत सध्या जाम चर्चेत आहे. होय, मीराने नुकतेच डिझाईनर मनीष मल्होत्रासाठी पहिले फोटोशूट केले. या फोटोशूटचा व्हिडीओ पाहून अनेकजण मीराच्या प्रेमात पडले. पण यानंतर मीराचे असे काही फोटो समोर आलेत की, ती ट्रोल झाली.
होय, काल रात्री मीरा तिच्या काही मैत्रिणींसोबत डिनर डेटवर गेली. तिच्या या डिनर डेटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि सोबत मीरा ट्रोल झाली. आता या फोटोत असे काय होते की, मीरा ट्रोल झाली? तर तिचा ड्रेस. होय, मीराचा ड्रेस आणि तिचा बोल्ड अवतार नेटकºयांना भावला नाही. लोकांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स देणे सुरु केले.


  मीराने शरीरावर पडदा का गुंडाळला? असा सवाल एका युजरने केला.  दुस-या एका युजरने तर ‘अपने आप को अ‍ॅक्ट्रेस समजती है क्या? शाहिद का नाम हटा दो बस कोई देखेगा भी नही,’, अशा शब्दांत मीराला ट्रोल केले. 

मीराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे एक से बढकर एक स्टायलिश फोटो पाहायला मिळतील. लग्नानंतर झालेला बदल मीराच्या या फोटोंमध्ये पाहायला मिळतो. मध्यंतरी मीरा आणि शाहिद कपूर ‘नच बलिये’ शोला जज करणार असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. मात्र काही कारणामुळे मीराचे आॅनस्क्रीन झळकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.   हातात कोणत्याही प्रकारचे काम नसतातना मीरा शाहिदपेक्षा जास्त चर्चेत असते.  ती सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टीव्ह असते. 
2015 मध्ये मीरा व शाहिदचे लग्न झाले होते. दोघांनाही दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मीरा बॉलिवूडमध्ये येण्यास उत्सूक असल्याची चर्चा आहे. कदाचित त्याची सुरुवात झालीय.

Web Title: shahid kapoor wife mira rajput steps out for dinner got trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.