ठळक मुद्देमीराच्या कपाळावर जखमेचा एक व्रण आहे. याबद्दलही तिने सांगितले.

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिची स्वत:ची फॅन फॉलोइंग आहे. शाहिदपेक्षा अधिक मीरा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. कधी फोटो शेअर करते, कधी व्हिडीओ तर कधी चॅट सेशन्स. आता मीराने चॅट सेशनद्वारे चाहत्यांच्या प्रश्नांना मजेदार उत्तरे दिलीत. शिवाय तिच्या क्रशबद्दलचे गुपितही उघड केले.

आय लव्ह हिम...

एका चाहत्याने मीराला तिच्या क्रशबद्दल विचारले. यावर मीराने असे काही उत्तर दिले की, सगळेच हैराण झालेत. साऊथ आफ्रिकाचा क्रिकेटपटू एबी डी विलियर्स मला आवडतो. आय लव्ह हिम, असे मीरा म्हणाली.

कपाळावरचा व्रण
मीराच्या कपाळावर जखमेचा एक व्रण आहे. याबद्दलही तिने सांगितले. मी तीन वर्षांची असताना बेडवर उड्या मारत होते. अचानक मी पडले आणि बेडचा कोपरा लागला आणि आयुष्यभरासाठी व्रण सोडून गेला.

शाहिदची ही सवय वैताग आणते...
शाहिद कपूर मॅसेज करताना खूप सारे टायपोज करतो. ते माझ्या डोक्यावरून जातात. पण हळूहळू मी ते समजू लागले आहे, असे एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना तिने सांगितले. शाहिदची प्रत्येक गोष्ट मला आवडते. त्याच्यातील प्रत्येक गोष्टीवर मी प्रेम करते, असेही ती म्हणाली.

स्पॅनिश शिकायचे राहिले...
अशी कोणती गोष्ट जी करायची होती, पण आत्तापर्यंत करता आली नाही, असा सवाल एका चाहत्याने केला. यावर स्पॅनिश शिकायचा खूप प्रयत्न केला. पण काही ना काही कारणाने राहिले, असे उत्तर तिने दिले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shahid kapoor wife mira rajput kapoor reveals her crush name says i love him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.