पोरीचा स्कर्ट घातलास का? शाहिदची मीरा सोशल मीडियावर होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 04:50 PM2021-07-06T16:50:02+5:302021-07-06T16:51:26+5:30

अभिनेता शाहिद कपूरची बायको इतकं सोडलं तर मीरा राजपूतचा बॉलिवूडशी काहीही संबंध नाही. पण तरीही मीरा चर्चेत असते. सध्या ती व्हिडीओमुळं चर्चेत आहे...

shahid kapoor wife mira rajput gets brutally trolled for her skirt and skin show | पोरीचा स्कर्ट घातलास का? शाहिदची मीरा सोशल मीडियावर होतेय ट्रोल

पोरीचा स्कर्ट घातलास का? शाहिदची मीरा सोशल मीडियावर होतेय ट्रोल

Next
ठळक मुद्दे2015 साली शाहिद आणि मीराने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर वर्षभरातच शाहिदच्या घरी मीशा नावाचे कन्यारत्न जन्मास आले. यानंतर 2018 मध्ये शाहिदला पुत्ररत्न प्राप्त झाले.

अभिनेता शाहिद कपूरची (Shahid Kapoor)  बायको इतकं सोडलं तर मीरा राजपूतचा (Mira Rajput) बॉलिवूडशी काहीही संबंध नाही. पण तरीही मीरा चर्चेत असते.  सोशल मीडियावर तर या ना त्या कारणानं तिची चर्चा होत असते.  सध्या ती चर्चेत आहे ते एका व्हिडीओमुळं. होय,मीराचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय आणि सोबत मीरा ट्रोलही होतेय.
 मीरा राजपूतचा हा व्हिडीओ सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात मीरा ब्राऊन कलरचा टॉप आणि मिनी स्कर्टमध्ये आहे. तशी मीरा नेहमीप्रमाणं सुंदर दिसतेय. पण अनेकांना तिचा हा अंदाज आवडला नाही. मग काय, नको त्या कमेंट्स करत अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ( Shahid Kapoor wife Mira Rajput gets brutally trolled)

असं वाटतंय जणू मुलीचा स्कर्ट घातलास, असं एका युजरनं लिहिलं. अन्य एका युजरनं तिला मलायकासारखं शो ऑफ न करण्याचा सल्ला दिला. एका युजरनं तर चक्क तिला आयटम गर्ल म्हणलं. इतकंच नाही तर एका युजरनं चक्क तिची तुलना शाहिदची एक्स-गर्लफ्रेन्ड करिना कपूरसोबत केली.   ‘याबाबतीत किमान करिना कपूरकडे  चांगला फॅशन सेन्स तरी आहे,’ असं या युजरनं लिहिलं. 

2015 साली शाहिद आणि मीराने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर वर्षभरातच शाहिदच्या घरी मीशा नावाचे कन्यारत्न जन्मास आले. यानंतर 2018 मध्ये शाहिदला पुत्ररत्न प्राप्त झाले. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला मीराचे एक से बढकर एक स्टायलिश फोटो पाहायला मिळतील. लग्नानंतर झालेला बदल मीराच्या या फोटोंमध्ये पाहायला मिळतो. 
सोशल मीडियावर ती सतत तिच्या अपडेट शेअर करत सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळेही तिच्या फॉलोव्हर्सच्या संख्येतही प्रचंड वाढ होत आहे.  वर्कआऊट करतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते.  

Web Title: shahid kapoor wife mira rajput gets brutally trolled for her skirt and skin show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app