'बद्रीनाथ की दुल्हनिया 'आणि' धडक 'सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक शशांक खेतान आपल्या पुढच्या चित्रपटाची तयारी करत आहेत.  हा अ‍ॅक्शन ड्रामा सिनेमा असेल ज्याचे तात्पुरते नाव 'योद्धा' ठेवण्यात आले आहे.

करण जोहर या चित्रपटाचा निर्मिती करणार आहे.  या सिनेमाच मुख्य भूमिका साकारण्यासाठी निर्मात्यांनी रणबीर कपूरकडे संपर्क साधला, पण तारखे नसल्यामुळे रणबीर करण्यास नकार दिला.  रणबीरकडे सध्या 'शमशेरा' आणि लव रंजनचा सिनेमा आहे. याशिवाय तो अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्येही व्यस्त आहे. त्यामुळे त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला.  रणबीरच्या नकारा दिल्यानंतर विकी कौशल आणि आयुष्मान खुरानानेही चित्रपट करण्यास नकार दिला, अशी चर्चा आहे. शाहिद कपूरला मात्र सिनेमाची  स्क्रिप्ट आवडली आहे  तो योद्धा सिनेमात काम करणार आहे.   

शाहिदचा 'शानदार' चित्रपटानंतर "योद्धा" हा करण जोहरसोबतचा दुसरा चित्रपट आहे. त्याचबरोबर शशांकच्या दिग्दर्शनाखाली तो पहिल्यांदा काम करताना दिसणार आहे.  चित्रपटाच्या अभिनेत्री बद्दल बोलायचे झाले तर शाहिदच्या अपोझिट शशांकला दिशा पाटनीला कास्ट करण्याचा विचार करतो आहे. 

सूत्रांनुसार चित्रपटाची कथा शाहिदच्या अवती भोवती फिरणारीआहे. चित्रपटाची पटकथा  व दिग्दर्शन शशांक करणार आहे. दिशाने या चित्रपट करण्यासाठी सहमती दर्शवली आहे परंतु अद्याप तिने या चित्रपट साइन केलेला नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shahid kapoor says yes to shashank khaitans yodha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.