shahid kapoor grandmother passed away ishaan khatter emotional writes long post |  शाहिद कपूरच्या आजीचे निधन,  ईशान खट्टर झाला भावूक  

 शाहिद कपूरच्या आजीचे निधन,  ईशान खट्टर झाला भावूक  

ठळक मुद्देखादिजा  या ईशान व शाहिदची आई नीलिमा आजमी यांच्या आई होत्या.  

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि ईशान खट्टर यांची आजी (आईची आई) खादिजा अजीम यांचे निधन झाले. खादिजा  या ईशान व शाहिदची आई नीलिमा आजमी यांच्या आई होत्या.  शाहिद आणि ईशान दोघांनीही सोशल मीडियावर आजीचे काही फोटो शेअर करत, भावूक पोस्ट लिहिली आहे.
या फोटोत खादिजा आपल्या कुटुंबासोबत दिसत आहेत. आजीच्या निधनाने ईशान चांगलाच भावूक झाला. सोशल मीडियावर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘अम्मी, तू आम्हा सर्वांना जगणे शिकवलेस. एक स्वातंत्र्य सेनानी, लेखिका, अनुवादक, संपादक असण्यासोबतच एक आई, बहीण, पत्नी, आजी, मित्र असे सगळे काही तू होतीस. याशिवाय तू खूप मोठी होतीस. तू माझ्या आयुष्याचा भाग होतीस, याचा मला कायम अभिमान असेल. तू माझ्यात कायम जिवंत असशील. माझे आयुष्य तुझ्या मायेने फुलले...,’ असे ईशानने लिहिले आहे.


अभिनेत्री नीलिमा आजमी यांनी पहिले लग्न अभिनेते पंकज कपूर यांच्यासोबत झाले. मात्र १९८४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर नीलिमा यांनी अभिनेते राजेश खट्टर यांच्याशी लग्नगाठ बांधली.

तुम्हाला ठाऊक असेलच की, शाहिद कपूर हा नीलिमा आणि पंकज यांचा मुलगा आहे. तर ईशान खट्टर हा नीलिमा आणि राजेश खट्टर यांचा मुलगा आहे. २००१ मध्ये नीलिमा आणि राजेश यांचा घटस्फोट झाला. यानंतर त्यांनी उस्ताद रजा अली खान यांच्याशी लग्न केले. आता त्या  त्यांच्यासोबतही राहत नसल्याचे कळते.

Web Title: shahid kapoor grandmother passed away ishaan khatter emotional writes long post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.